आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 23 नोव्हेंबर रोजी शतभिषा नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : मरून| अंक : ४
पतप्रतिष्ठा वाढेल. आज आप्तस्वकीयांत तुमच्या शब्दास मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल.

वृषभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : १
कार्यक्षेत्रात महत्त्वाकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर केवळ स्वप्नरंजनापेक्षा प्रयत्नांस प्राधान्य गरजेचे राहील. तुमच्या अंगी असलेल्या नेतृत्व गुणांस वाव मिळेल.

मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ३
व्यापाराची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल. आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. दैव तुमच्याच बाजूने आहे. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.

कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : २
वैवाहिक जीवनात किरकोळ वाद संभवतात पण फार ताणून धरू नका. सासूरवाडीकडून काही लाभ संभवतो.

सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७
इतरांच्या भानगडीत न डोकावता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे. प्रवासात खोळंबा संभवतो.

कन्या : शुभ रंग : चंदेरी| अंक : ५
कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील. इतरांवर विसंबून न रहाता स्वावलंबनाचे धोरण ठेवा.

तूळ : शुभ रंग : राखाडी|अंक : ८
तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील. आज मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागेल.

वृश्चिक : शुभ रंग : निळा|अंक : ९
कामधंद्याच्या ठिकाणी तुमचे महत्त्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्या पूर्ण कराल.

धनू : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
सामाजिक कामे करणाऱ्यांना समाजाकडून आदर प्राप्त होईल. आज परिवारासाठी वेळ देणे कठीण जाईल.

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : ४
वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल. गृहसौख्य लाभेल.

कुंभ : शुभ रंग :पांढरा|अंक : ८
तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने तुमची कार्यक्षमताही चांगली असेल.

मीन : शुभ रंग : भगवा|अंक : ६
लहरी व हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवा. तुमची मते सगळ्यांना पटणार नाहीत. एखद्या प्रसंगी सामंजस्याने मार्ग काढावा लागेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser