आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 25 जानेवारी रोजी मृगशीर्ष नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती ऐंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष: शुभ रंग: पांढरा| अंक : ४
दिवसाच्या पूर्वाधार्तच महत्वाची कामे उरकून घ्या. आज अनपेक्षित येणाऱ्या पाहुण्यांची उठबस करावी लागेल.

वृषभ: शुभ रंग: पिस्ता| अंक : १
धंद्यात आवक मनाजोगती राहील. मूड छान राहील. आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस.

मिथुन : शुभ रंग : भगवा| अंक : २
नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदीन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. दिवस खर्चाचा, आज बचत शक्य नाही.

कर्क : शुभ रंग : मरून| अंक : ८
कालपासूनचे तुमचे भरलेले खिसे दुपारनंतर रिकामे होतील. आज अनाठायी खर्चावर लगाम अवश्यक.

सिंह :शुभ रंग : क्रिम|अंक : ४
आज रिकाम्या गप्पा टाळा कारण त्यातूनच गैरसमज पसरतील. भावनेच्या भरात कुणाला वचने देऊ नका.

कन्या : शुभ रंग : चंदेरी|अंक : ६
नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावरच ढकलेली बरी.आज शासकिय कामात अनंत अडचणी येणार आहेत.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ९
मोेठे आर्थिक व्यवहार सतर्कतेने करा. कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे.

वृश्चिक : शुभ रंग : निळा| अंक : २
ध्येयाचा पाठलाग करता करता प्रकृतीकडे दुर्लक्ष होईल. आज पत्नीचेच सल्ले फार उपयुक्त ठरणार आहेत.

धनु : शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. एखादा बरा झालेला आजारही उलटण्याची शक्यता आहे.

मकर : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
घरात अधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना संधी चालून येतील.

कुंभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : १
धंद्यात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्टांची तुमची तयारी असेल. गृहीणींसाठी व्यस्त दिवस.

मीन : शुभ रंग : आकाशी| अंक : ४
रागिट स्वभाव काबूत ठेवणे गरजेचे आहे. अती स्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. मुलांचे हट्ट वाढतील.