आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

सोमवार 25 मे रोजी मृगशीर्ष नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. हा योग 12 पैकी 8 राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : ३

आज तुमचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जाईल. काही महत्त्वाच्या कामासाठी बरीच वणवण होईल.

वृषभ: शुभ रंग : केशरी | अंक : ४

व्यापारात नफा होईल. कार्यक्षेत्रात काही चांगल्या घटना घडतील. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवा.

मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७

दिवसाची सुरुवात अत्यंत आनंदी व उत्साही असेल. कुठेही आपली मर्जी चालवण्याचा प्रयत्न कराल. आज इतरांचेही ऐकून घेण्याची मानसिकता ठेवा.

कर्क : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८

आज अनावश्यक खर्च कमी करूनच जमाखर्चाचा ताळमेळ साधावा लागेल. प्रवासात मौल्यवान जपा.

सिंह : शुभ रंग : राखाडी | अंक : ९

आज स्वत:च्या प्रेमात राहाल.चैन करण्यासाठी पैसा खर्च कराल. पूर्वीच्या गुंतवणुकीतून फायदा होईल.

कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६

मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्वीकाराल. अनुकूल दिवस.

तूळ : शुभ रंग : लाल | अंक : ५

नवीन व्यावसायिक मंडळींनी मर्यादा ओळखूनच उलाढाली केलेल्या बऱ्या. देव नवसाला पावेल.

वृश्चिक : शुभ रंग : मरून| अंक : ७

अती आक्रमकता कामाची नाही. थोरांचे अनुभवाचे बोल ऐकून घेणे हिताचे. अधिकारांचा गैरवापर नको.

धनू : शुभ रंग : मोरपिशी| अंक : ३

आज काही सज्जनांच्या सहवासात रहाल. वैवाहिक जिवन सौख्यपूर्ण राहील. आरोग्य उत्तम साथ देईल.

मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : १

कंटाळवाणा दिवस. क्षुल्लक कामात अडचणींचा सामना करावा लागेल. सामंजस्याचे धोरण हिताचे.

कुंभ : शुभ रंग : क्रीम | अंक : ४

सौंदर्य प्रसाधने, चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. ऐशआरामी वृत्ती बळावेल. आनंदी दिवस.

मीन : शुभ रंग : गुलाबी| अंक : २

आर्थिक आवक पुरेशी असून आज परिवारात खेळीमेळीचे वातावरण राहील. मुले आज्ञाधारकपणे वागतील.

बातम्या आणखी आहेत...