आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 26 एप्रिलला चित्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रहस्थितीमुळे वज्र नावाचा एक अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. वाद आणि तणावाची स्थिती निर्माण होऊ शकते. या व्यितिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणार राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : २
आज तुम्हाला काही मान-अपमानाच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. दिवस अनुकूल नाही. तब्येतीस सांभाळा.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
नोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. रुग्ण आज ठणठणीत बरे होतील. कला क्षेत्रात नवोदितांना उत्तम संधी चालून येतील.

मिथुन : शुभ रंग : क्रीम| अंक : ५
आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.कलाकार मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील.

कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
घराबाहेर डोके शांत ठेवा, वादविवाद होतील. गृहिणींना तर आज अजिबात उसंत मिळणार नाही.

सिंह : शुभ रंग : लाल|अंक : ७
आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मन:स्थितीही चांगली राहील.

कन्या : शुभ रंग : मोतिया|अंक : ८
आज ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देणार आहे. देण्याघेण्याचे व्यवहार मात्र काळजीपूर्वक करावेत.

तूळ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ६
काही अवश्यक खर्च हात जोडून उभे असतील. आज वडीलधाऱ्यांच्या कलाने घ्यावे लागणार आहे.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ३
व्यापार-उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल. संततीचे विवाह योग जुळून येतील. अनुकूल दिवस.

धनू : शुभ रंग : केशरी|अंक : ५
कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठिकाणी बढतीची चाहूल लागेल. अधिकाऱ्यांच्या अपेक्षा वाढतील.

मकर : शुभ रंग : मरून|अंक : ४
कार्यक्षेत्रात अनपेक्षित अडचणी येतील. हाताखालच्या मंडळीत आज मिळून मिसळूून राहणे गरजेचे आहे.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : १
हितशत्रू सक्रिय अाहेत. प्रत्येक निर्णय विचारांती घ्या. आज स्वावलंबनाने यश सोपे होईल. सत्संगात राहा.

मीन : शुभ रंग : निळा|अंक : २
घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. आज एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल.

बातम्या आणखी आहेत...