आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 26 जुलै रोजी धनिष्ठा नक्षत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असतील तर सोमवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : रखाडी | अंक : १
कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहीणी आवडत्या छंदास वेळ देतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमरची चव चाखता येईल. विद्यार्थ्यांना सुयश.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३
कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरूणांनी व्सनसंपासून दूर रहाणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी. नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक रहाणे गरजेचे आहे.

मिथुन : शुभ रंग : क्रिम|अंक : ९
व्यवसायात भागिदारांशी सलोख्याचे संबंध राहतील.वैवाहीक जिवनांत खेळीमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आशादायी दिवस.

कर्क : शुभ रंग : चंदेरी|अंक : ५
मोठया आर्थिक उलाढाली टाळायला हव्यात. आज विश्वासातील माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकेल. स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका.

सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७
आज घरातील वडीलधारी मंडळी हट्टीपणाने वगतील. कामधंद्यातील काही अनपेक्षित अडचणी मानसिक स्वास्थ्य बिघडवतील. आज एकांत हवासा वाटेल.

कन्या : शुभ रंग : सोनेरी | अंक : ८
नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तूळ : शुभ रंग : मरून | अंक : १
सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. कर्जप्रस्ताव मंजूर होऊ शकतील. हितशत्रू पळ काढतील.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा | अंक : २
कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही महत्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होण्याची शक्यता आहे. काही देणी चुकवावी लागतील.

धनू : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ४
सडेतोड बोलण्यामुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक क्लीष्ट कामेही सोपी होतील.

मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : ५
पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहीक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.

कुंभ : शुभ रंग : भगवा | अंक : ३
आजचा दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींंना प्रवासाचे याेग अटळ आहेत. नव्या ओळखी होतील.

मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ६
आज दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. जागाविषयक प्रश्न सुटतील. प्रेमप्रकरणांत मात्र डोक्याला नुसता ताप होईल.

बातम्या आणखी आहेत...