आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज श्रावण मासातील पहिला श्रावणी सोमवार तसेच साध्य नावाच्या शुभ योगात होत आहे दिवसाची सुरुवात...
Advertisement
Advertisement

सोमवार 27 जुलै रोजी चित्रा नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज श्रवण मासातील पहिला श्रावणी सोमवार आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारीक देवाणघेवाण होईल. वैवाहीक जिवनांत सुसंवाद राहील.

वृषभ: शुभ रंग : राखाडी | अंक : ३
काही कामे नि:स्वार्थीपणे कराल. कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असेल. तरीही तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील. आजच्या कष्टांचे फळ उद्या नक्की.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ८
नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल.आज कामावर दांडी मारून थोडं करमणूकीस प्राधन्य द्यावेसे वाटेल. प्रेमप्रकरणांना आज ग्रीन सिग्नल आहे.

कर्क : शुभ रंग : मरून | अंक : १
सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबियांना आज अभिमानास्पद वाटेल अशी कामगिरी कराल.

सिंह : शुभ रंग : नारिंगी| अंक : ७
आज तुम्हाला एखादी गुप्त बातमी समजेल.गृहीणींनी आज झकाली मूठ झकालीच ठेवणे गरजेचे आहे.

कन्या : शुभ रंग : निळा| अंक : ९
राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. भाग्योदयाकडे वाटचाल होईल.

तूळ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६
आज तुमचे मन काहीसे चंचल राहील. हातचे सोडून मृगजळामागे धावण्याचा मोह होईल. पण तसे करू नका.

वृश्चिक : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५
पैसा येण्याइतकेच आज पैसा जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील. चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे

धनू : शुभ रंग : केशरी | अंक : १
योग्यवेळी घेतलेल्या निर्णयांचे चीज होईल. व्यवसायात आवक मनाजोगती असेल. मित्रमंडळींत मोठेपणा घ्याल.

मकर : शुभ रंग : भगवा | अंक : ३
अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. मित्रांच्या फार नादी लागू नका.

कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : २
आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येण्याची शक्यता आहे. काम कमी व धावपळच जास्त होईल.

मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ४
भागिदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होण्याची शक्यता आहे. देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता असावी.

Advertisement
0