आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 28 डिसेंबर 2020 ला शुभ नावाचा खास योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. सोमवारी आद्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : सोनेरी| अंक : १
विरोधकांचा विरोध मावळेल. कार्यक्षेत्रात नवीन हितसंबंध निर्माण होतील. पुरेशी बचत करता येईल.

वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
काही मनाजोगत्या घटना घडल्याने कार्यउत्साह वाढेल. महत्त्वाच्या चर्चेत अग्रेसर राहाल. कुणी केलेल्या खोट्या स्तुतीनेही भारावून जाल.

मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ३
नवीन व्यावसायिकांनी आर्थिक धाडस करताना कुवत अोळखून करावेे. गुंतवणूक करतानाही तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. कर्ज प्रस्ताव रखडतील.

कर्क : शुभ रंग : पांढरा| अंक : ५
योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन याच्या जोरावर प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. ध्येयाकडे कूच कराल.

सिंह : शुभ रंग : गुलाबी|अंक : २
आज ऐकावे जनाचे व करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील. आत्मविश्वास व स्वावलंबन गरजेचे आहे.

कन्या : शुभ रंग : चंदेरी|अंक : ७
कार्यक्षेत्रात हाताखालच्या लोकांशी सलोख्याचे संबंध असणे गरजेचे आहे. उपासनेत खंड पडू देऊ नका.

तूळ : शुभ रंग : शुभ रंग : निळा| अंक : ६
कुणालाही सल्ले द्यायच्या भानगडीत पडू नका. मनस्ताप देणाऱ्या घटना घडतील. रिस्क नको.

वृश्चिक : शुभ रंग : क्रिम| अंक : ८
काेणत्याही क्षेत्रात असलात तरी स्पर्धा अटळ आहे. खेळाडूंना आज अटीतटीची झुंज द्यावी लागणार आहे.

धनु : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ९
बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. कामगारांच्या रास्त मागण्या मान्य होतील. जास्त दगदग टाळावी.

मकर : शुभ रंग : मरून| अंक : ३
विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल.सहकुटुंब मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल.

कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : १
भावंडात प्रेम राहील. गृहिणी स्वत:च्या आवडीस प्राधान्य देतील. मुले पालकांच्या आज्ञेत राहतील.

मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
दैनंदिन कामांचा कंटाळा येईल. इतरांना न जमणारे काहीतरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.

बातम्या आणखी आहेत...