आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 28 फेब्रुवारी रोजी उत्तराषाढा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती वरियान नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना लाभाचा दिवस असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जाऊ शकतात. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : मरून| अंक : १
व्यवसायात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तुमची तयारी असेल. आज व्यस्त दिवस.

वृषभ : शुभ रंग : हिरवा| अंक : ७
कार्यक्षेत्रात आज काही बिकट प्रसंग यशस्वीपणे हताळाल. मित्रमंडळींत तुमच्या शब्दास मान राहील.

मिथुन : शुभ रंग : जांभळा | अंक : ८
आज स्वत:चा विचार करा. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारू नका. प्रतिकूल दिवस.

कर्क : शुभ रंग : राखाडी | अंक : ९
जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहीणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील.

सिंह : शुभ रंग : पांढरा| अंक : २
महत्वाच्या चर्चेत फक्त ऐकण्याचे काम करा. मोफत सल्ले देऊ नका. गोड बोलून स्वार्थ साधून घेणे योग्य.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ६
नोकरदार बढती बदलीच्या बातम्यांनी सुखावतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाचे तास वाढवावे लागतील.

तूळ : शुभ रंग : गुलाबी| अंक : १
तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या महत्वाकांक्षा वाढतील.
वृश्चिक : शुभ रंग : केशरी| अंक : ५
अती हुषार माणसे संपर्कात येतील. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा नकाे. स्वावलंबन कामी येईल.

धनु : शुभ रंग : आकाशी| अंक : ४
व्यापारी वर्गास अत्यंत लाभदायी दिवस आहे. काही जूनी येणी अाज वसूल होण्याची शक्यता आहे.

मकर : शुभ रंग : निळा| अंक : ३
नव्याने झालेल्या ओळखीतून व्यापारवृध्दी होईल. विवाहेच्छूकांना योग्य जिवनसाथीचा लाभ होईल.

कुंभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ८
आज तुमची अत्यंत व्यस्त दिनचर्या राहील. एखादा पत्ता शोधण्यासाठी बरीच पायपीट होणार आहे.

मीन : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ३
कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. तुमची मोठया लोकांमधील उठबस फायदेशीर राहील.

बातम्या आणखी आहेत...