आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशुभ योगाने सुरु होत आहे दिवसाची सुरुवात

सोमवार 29 जुनेचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. हस्त नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून परीघ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ६

प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर ध्येयप्राप्ती कडे तुमची वाटचाल सुरुच राहील. सहकाऱ्यांची मते समजून घ्या. 

वृषभ: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५

उच्चशिक्षितांना  मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. मित्रांमध्ये तुमच्या शब्दास मान राहील. छान दिवस. आज चैन करण्यासाठी हाती पुरेसा पैसा असेल.

मिथुन : शुभ रंग : मरून | अंक : ७

अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येईल. त्याचप्रमाणे खर्चाचेही विविध मार्ग खुणावतील. गृहीणींना विविध जाहीराती भुरळ घालतील. पायपीट होईल.

कर्क :  शुभ रंग : चंदेरी | अंक : ९

परिवारातील सदस्यांच्या गरजा वाढत राहतील. एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागेल. खर्च वाढेल.

सिंह : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३

आज आपल्याच धुंदीत व आपल्याच मस्तीत रहाल. इतरांचे विचार पटणार नाहीत. शब्द जपून वापरा.

कन्या : शुभ रंग : डाळींबी | अंक : ८

आज अती आक्रमकतेने नुकसान होईल. नोकरीत वरीष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करताना नाकी नऊ येतील.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २

रिकामटेकडया चर्चेत वेळ फुकट जाईल. आज मोठया आर्थिक  व्यवहारात सावध रहाणे गरजेचे आहे.

वृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ४

नोकरदारांना वरीष्ठांकडून सन्मानाची वागणूक मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. मस्त दिवस.

धनू :  शुभ रंग : गुलाबी | अंक : ६

कामाचा व्याप, अती महत्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. कुटुंबासाठी वेळ काढणे कठीण जाईल.

मकर : शुभ रंग : भगवा | अंक : ३

कार्यक्षेत्रातील बिकट प्रसंग सहजच सोडवू शकाल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. दैवाची साथ आहेच.

कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ८

कुसंगतीपासून लांबच रहा. नितीबाह्य वर्तन आंगाशी येईल. वाहन चालवताना शिस्त पाळणे गरजेचे राहील.

मीन :शुभ रंग :पांढरा|अंक : १

मनासारख्या घटनांनी तुमची उमेद वाढेल. वैवाहीक जिवनांत लाडीक रुसवे फुगवे असतील. 

बातम्या आणखी आहेत...