आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 29 मार्च रोजी हस्त नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : लाल| अंक : १
अति धावपळ टाळा. हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ६
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे.कौटुंबिक अडचणी वडीलधाऱ्यांच्या मदतीने सुटतील. आधुनिक राहणीमानावर तुमचा बराच खर्च होईल.

मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ३
पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस. स्थावराच्या खरेदी-विक्रीतून चांगला फायदा होईल.

कर्क : शुभ रंग : क्रीम| अंक : २
उद्योगधंद्यातील महत्त्वपूर्ण करारमदार दुपारपूर्वीच उरकून घ्या. संध्याकाळी वाहन चालवताना सतर्क राहा.

सिंह : शुभ रंग : मोतिया|अंक : ५
वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. वास्तू व वाहन खरेदीसठी कर्जमंजुरी होईल. आज म्हणाल ती पूर्व.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ४
तरुणांनी मौजमजा करताना मर्यादांचे उल्लंघन करू नये. उद्धटपणास लगाम गरजेचा आहे. संयम ठेवा.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ७
नोकरी-व्यवसायात व्यग्रता वाढेल. पारिवारिक सदस्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण असेल. काही दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील.

धनू : शुभ रंग : केशरी|अंक : ८
आज संमिश्र फळे देणारा दिवस असून नोकरी-व्यवसायात मानसन्मान वाढेल. आज तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल.

मकर : शुभ रंग : जांभळा|अंक : ७
आज आपल्या महत्त्वाकांक्षांवर लक्ष केंद्रित कराल. रिकामटेकड्या मित्रमडळींना दुरूनच राम राम कराल.

कुंभ : शुभ रंग : निळा| अंक : ५
काही गोडबोली माणसे भेटतील. नवीन ओळखीत लगेच विश्वास ठेवू नका. मोहाचे क्षण टाळा.

मीन : शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. जोडीदाराचे मन जपाल. छान दिवस.

बातम्या आणखी आहेत...