आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 28 सप्टेंबर रोजी ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीमुळे धृती आणि शुभ नावाचे दोन खास योग जुळून येत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावाने आठ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. जॉब आणि बिझनेसमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. अडकलेला पैसा परत मिळण्याचे योग जुळून येत आहेत. गुंतवणुकीत फायदा होईल. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : ९
आज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य देणार आहात. मित्रमंडळींबरोबर मात्र आज काहीतरी बिनसणार आहे.

वृषभ : शुभ रंग : हिरवा| अंक : १
घरात काहीतरी कारणाने वडिलधाऱ्यांंशी मतभेद होऊ शकतात. आपले म्हणणे त्यांना पटवून सांगायचा व्यर्थ खटाटोप न करता त्यांच्या वयाचा मान राखा.

मिथुन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
आज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. हातचे सोडून पळत्या मागे अजिबात धावू नका व कायद्याची चौकट मोडू नका.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ९
नोकरीत कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांच्या मागेपुढे करावे लागेल. घरात पत्नीचेही मूड सांभाळणे गरजेचे.

सिंह : शुभ रंग : मरून|अंक : ८
कार्यक्षेत्रात तुमची वाटचाल योग्य दिशेने चालू राहील. सहजच घेतलेले निर्णयही योग्यच ठरतील.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ६
आर्थिक बाजू उत्तम असेल. मुलांना दिलेले शब्द पाळू शकाल. आज प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

तूळ : शुभ रंग : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ७
कौटुंबिक प्रश्न तुम्हाला चिंताग्रस्त करतील. परंतु, जोडीदाराच्या सहकार्याने त्यावर सहज मात कराल.

वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता|अंक : १
रखडलेल्या योजना सुरू करू शकाल. स्पर्धकांना तुमचा हेवा वाटेल. गरजूंना आपणहून मदत कराल.

धनु : शुभ रंग : क्रिम| अंक : ५
बऱ्याच दिवसांपासूनची काही अपुरी स्वप्ने साकार होणार आहेत. आज खिशात पैसा खेळता राहील.

मकर : शुभ रंग : नारिंगी| अंक : २
हट्टीपणास लगाम घालून इतरांचेही विचार ऐकून घ्यायची तयारी ठेवा. आज फार आक्रमकता नको.

कुंभ : शुभ रंग : निळा | अंक : ३
कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकणे गरजेचे आहे.तुम्ही भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकतील.

मीन : शुभ रंग : आकाशी | अंक : ४
आज तुम्हाला एखाद्या नवीनच क्षेत्रात काम करायची संधी मिळेल व त्या संधीचे तुम्ही सोने कराल. ध्येय साध्य होतील.