आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज श्रावण मासातील राखीपौर्णिमा आणि शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

सोमवार 3 ऑगस्ट रोजी श्रावण मासातील पौर्णिमा तिथी असून याच तिथीला रक्षाबंधन सण साजरा केला जातो. प्रीती नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात. आजच्या या शुभ योगामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ८
कामाचा व्याप, अती महत्वाकांक्षा यामुळे काहीसे सैरभैर व्हाल. कुटुंबासाठी वेळ काढणे अशक्य होईल.

वृषभ: शुभ रंग : मोरपिशी | अंक : २
उद्योगधंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असल्याने नव्या उपक्रमाची सुरवात टळा. आज तुम्हाला भक्तीमार्गात गोडी वाटेल. सज्जनांच्या सहवासात तुमचे मन रमेल.

मिथुन : शुभ रंग : भगवा | अंक : ५
आज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नकोत. सगळयाच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील अशी अपेक्षा नकाे.

कर्क : शुभ रंग : मरून | अंक : ६
आज मित्रांमधे न रमता आपल्या जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील. शब्द हे शस्त्र आहे याचे भान असुद्या.

सिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ४
कुणाकडून काही येणी असतील तर मागायला लाजू नका. अती श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल.

कन्या : शुभ रंग : गुलाबी|अंक : ९
प्रकृती ठणठणीत असल्याने तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल.

तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : १
कष्टांचाही अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे लक्षात ठेवा. आज व्यस्त दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
आज घरदुरुस्तीच्या किरकोळ कामात लक्ष घालावे लागणार आहे. कदाचित वाहनही रूसून बसेल.

धनू : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७
धंदेवाईक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील. नवे उपक्रम सुरु करता येतील. प्रवासात दगदग होईल.

मकर : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ४
आज एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल. तब्येत थोडी नरमच राहील. संयम ढळू देऊ नका.

कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : १
बेरोजगारांनी रोजगारासाठी दूरगावी जाण्याची तयारी ठेवावी. आज खर्च आवाक्या बाहेर जाणार आहे.

मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
प्रतिष्ठींतांच्या ओळखी स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील. उच्चशिक्षितांना मोठया पॅकेज च्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील.