आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 30 नोव्हेंबर रोजी रोहिणी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शिवा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष: शुभ रंग : क्रिम | अंक : १
कंजूषपणा सोडावा लागेल. आवश्यक खर्च करावाच लागणार आहे. काही कर्जहप्ते फेडावे लागणार आहेत. बेरोजगारांची भटकंती चालूच राहणार आहे.

वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : २
कौटुंबिक सदस्य सामंजस्याने वागतील. वास्तु किंवा वाहन खरेदीची स्वप्ने साकार होतील. अत्यंत आनंदी व उत्साही असा आजचा दिवस सत्कारणी लावाल.

मिथुन : शुभ रंग : आकाशी | अंक : ७
उच्चपदस्थांच्या जबाबदाऱ्या व अधिकार वाढणार आहेत. आज अत्यंत व्यस्त दिवस असून व्यवसायात चढाओढीचा सामना करण्यासाठी सज्ज राहवे लागेल.

कर्क : शुभ रंग : केशरी | अंक : २
रिकाम्या गप्पांत वेळ न दवडता आज तुम्हाला कृतीस प्राधान्य द्यावे लागणार आहे. कार्यक्षेत्रात वाढत्या स्पर्धेचे दडपण येईल. दैव तुमच्या बाजूने आहे.

सिंह : शुभ रंग : लाल | अंक : ३
काही मनाविरूध्द घटना घडल्याने तुमचे मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. कर्जमंजूरीची कामे लांबतील. कायद्यात रहाल तरच फयद्यात रहाल.

कन्या : शुभ रंग : अबोली | अंक : २
वादविवादात समोरची व्यक्ती आपल्यापेक्षा हुषार असूही शकते याचे भान असूद्या. गोड बोलून स्वार्थ साधून घेणे आज गरजेचे. पत्नीस दिलेली वचने पाळणे हिताचे.

तूळ: शुभ रंग : मोतिया | अंक : ४
नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. महत्वाकांक्षांना आवर घालून थोडे विश्रांतीस प्राधान्य देणेही गरजेचे आहे. काही येणी वसूल होतील.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५
घरात सुखसुविधांसाठी खर्च कराल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात आज जास्तीत जास्त वेळ घालवाल. खेळाडू व कलाकार मंडळींना चाहत्यांचे प्रेम लाभेल.

धनू : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८
दैनंदीन कामे आज सुरळीत पार पडतील. आज काही कौटुंबिक प्रश्न साेडवण्यास प्राधान्य द्याल. गृहीणींनी गप्पा आवरत्या घ्याव्यात कारण त्यातूनच गैरसमज होतील.

मकर : शुभ रंग : जांभळा | अंक : ६
आज दैनंदीन कामातही अडथळे संभवतात. घरात पुरेसा वेळ न दिल्याने कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. शेजारी आपलेपणाने वागतील. व्यस्त दिवस.

कुंभ : शुभ रंग : नारिंगी | अंक : ७
खिशात वजन असल्याने मित्रमंडळीतही तुमच्या शब्दाला वजन असेल. भावनेच्या भरात कुणाला अश्वासने देणे टाळा. आज वक्ते सभा गाजवतील.

मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ९
मनाच्या चंचलतेस लगाम अवश्यक आहे. सडेतोड वृत्तीमुळे काही आपलीच माणसे दुरावण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला काहीतरी हरवलेले गवसेल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser