आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

आजचे राशिभविष्य3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुभ योगामध्ये होत आहे ऑगस्ट महिन्यातील शेवटच्या दिवसाची सुरुवात. श्रवण नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. आजच्या ग्रहस्थितीचा लाभ 12 पैकी 6 राशीच्या लोकांना होईल. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५
नोकरीच्या ठीकाणी फक्त आपल्या वाटयाचे काम करा.कामाच्या व्यापात घरगुती प्रश्न दुर्लक्षित होतील.

वृषभ: शुभ रंग : जांभळा | अंक : २
नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावरच ढकलेली बरी. शासकिय कामे रखडणार आहेत. गृहीणींचा आज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल.

मिथुन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ३
नवीनच झालेल्या ओळखीत आर्थिक व्यवहार करताना सावध रहायला हवे. शारिरीक कष्टांची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे.

कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : १
कामे विनाव्यत्यय पार पडतील. कुटुंबियांस पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न कराल. गृहसौख्याचा दिवस.

सिंह :शुभ रंग : भगवा|अंक : ४
रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा एखादा बरा झालेला आजार उलटण्याची शक्यता आहे.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ७
अाज वैवाहीक जिवनात मधुरता राहील. घरात अधुनिक सुखसुविधांसाठी तुम्ही हौशीने खर्च कराल.

तूळ : शुभ रंग : आकाशी|अंक : ६
आज मित्रपरिवारात तुमच्या शब्दास मान राहील. परंतू आज भावनेच्या भरात कुणालाही शब्द देऊ नका.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी|अंक : ९
नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. मुलांना अभ्यास सोडून सर्व काही सुचेल.

धनु : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८
वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. जोडीदाराची साथ मोलाची राहील.

मकर : शुभ रंग : तांबडा | अंक : ३
मोठया लोकांच्या ओळखीने आपले हित साधून घेता येईल. जिवलग मित्र आज हिताचे सल्ले देतील.

कुंभ : शुभ रंग : नारिंगी | अंक : ७
नोकरदारांना ओव्हर टईम करावा लागेल. वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. दिवस कष्टांचा.

मीन : शुभ रंग : चंदेरी | अंक : ४
कार्यक्षेत्रात काही अनुकूल घटना मनोबल वाढवतील. उद्योग व्यवसायात यश दृष्टीक्षेपात येईल. घेतलेले निर्णय योग्य ठरतील.