आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 4 एप्रिल रोजी 12 पैकी सात राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. सोमवारी विषकुंभ नावाचा अशुभ योग जुळून येत असल्यामुळे या सात राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८
आज काही प्रिय पाहुणे घरी पायधूळ झाडतील. अती स्पष्टवक्तेपणा बाजूला ठेऊन फक्त गोड गोड बोला.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
खर्चाचे प्रमाण वाढले असले तरी काळजी नको. दुपार नंतर काही रक्कम हाती येण्याची शक्यता आहे.

मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : २
काही कारणाने दूरावलेले मित्र आज जवळ येतील. नोकरीत बढतीच्या प्रतिक्षेत असाल तर गुड न्यूज.

कर्क : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
आज काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारीक देवाणघेवाण होईल. गृहीणी दानधर्म करतील.

सिंह : शुभ रंग : सोनेरी| अंक : ३
नोकरीच्या ठीकाणी तुमचे महत्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारून त्या पूर्ण कराल.

कन्या : शुभ रंग : निळा | अंक : ४
मन काहीसे चंचल राहील. हातचे सोडून मृगजळामागे धावण्याचा मोह होईल. गैरवर्तन टाळा, प्रतिष्ठेस जपा.

तूळ : शुभ रंग : केशरी | अंक : ५
आज एखादी गुप्त बातमी समजेल. गृहीणींनी आज झकाली मूठ झकालीच ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी| अंक : ९
कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील. आज वाद टाळावेत.

धनु : शुभ रंग : आकाशी| अंक : १
कामावर दांडी मारून थोडं करमणूकीस प्राधान्य द्यावेसे वाटेल. प्रेमप्रकरणांना ग्रिन सिग्नल आहे.

मकर : शुभ रंग : राखाडी| अंक : २
मित्र हिताचेच सल्ले देतील. वैवाहीक जिवनात गोडवा राहील. आज संततीकडून सुवार्ता येतील.

कुंभ : शुभ रंग : चंदेारी| अंक : २
सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबियांना अभिमान वाटण्याजोगी एखादी कामगिरी कराल.

मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
आवक पुरेशी असली तरी खर्च जपून करा कारण दुपारनंतर काही अनपेक्षित खर्च दार ठोठावतील.

बातम्या आणखी आहेत...