आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार 

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
 • कॉपी लिंक
 • एक शुभ आणि एक अशुभ योगामध्ये होत आहे आठवड्यातील पहिल्या दिवसाची सुरुवात

सोमवार, 4 मे  रोजी उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामुळे सूर्योदय होत असून आजच्या ग्रहस्थितीमुळे  व्याघात व हर्षण नावाचा एक अशुभ आणि एक शुभ योग जुळून येत आहे. व्याघात योग सकाळी 8:36 पर्यंत राहील. या अशुभ योगाच्या प्रभावाने वित्तहानी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची कामे अपूर्ण राहू शकतात. त्यानंतर हर्षण नावाचा शुभ योग दिवसभर राहील. या शुभ योगामुळे काही राशींचे नशीब उजळू शकते. या शुभ/अशुभ योगाचा प्रभाव 12 पैकी 6 राशींच्या लोकांसाठी खास तर इतर राशींसाठी संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

 • मेष : शुभ रंग : मरून | अंक : ६

काही दूरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश अगदी हाकेच्या अंतरावर आल्याची जाणीव होईल. छान दिवस.                                                                                                                  

 • वृषभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ३

तरुणांनी मौजमजा करताना नितिमत्तेचे भान ठेवावे. उध्दटपणास लगाम गरजेचा आहे. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.

 • मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ९

आज व्यवसाय तेजीत चालतील. आपल्या अधिकारांचा दूरुपयोग टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी.

                       

 • कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : २

अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. कौटुंबिक सदस्यांत सामंजस्य राहील. विवाह विषयी बोलणी करायची असतील तर आजचा दिवस योग्य.

 • सिंह : शुभ रंग : आकाशी | अंक : ४

नोकरीच्या ठीकाणी स्वत:चे महत्व सिध्द करायचे असेल तर वाढीव जबाबदाऱ्या टाळून चालणार नाहीत.कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे.                      

 • कन्या : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ८

महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.आज तुमचा अध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील. महत्वापूर्ण निर्णय अनुभवी व्यक्तींच्या सल्ल्याने घ्या. 

 • तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १

आज अती आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. नवीन ओळखीत डोळे झाकून विश्वास ठेऊ नका. ताकही फूंकून प्या.  

 • वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ७ व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकनदारांच्या गल्ल्यात लक्षणिय वाढ होईल. नोकरदार वरीष्ठांची मर्जी संपादन करू शकतील. वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील.
 • धनू : शुभ रंग : चंदेरी | अंक : ५ कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा जोर वाढलेला आहे. नोकरीत हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. काही जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे.
 • मकर : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४ अधुनिक राहणीमानाकडे तुमचा कल असेल. चैनी व विलासी वृत्ती बळावेल. खेळाडूंच्या महत्वाकांक्षा वाढतील. नवीन विषयात गोडी निर्माण होईल.
 • कुंभ : शुभ रंग : क्रिम| अंक : ४

कौटुंबिक जिवन समाधानी असल्याने तुम्ही घराबाहेरही आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आज पैशाची कमतरता भासणार नाही. आईचे मन दुखाऊ नका.

 • मीन : शुभ रंग : अबोली | अंक : २

तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. आज भावंडांमधे सामंजस्य राहील. गृहीणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत. 

बातम्या आणखी आहेत...