आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 रोजी 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आजच्या दिवशी भरणी नक्षत्रामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. यामुळे सहा राशीच्या लोकांना धनहानीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांचे काम बिघडू शकते. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. काही निर्णय चुकीचे ठरू शकतात. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : भगवा| अंक : ५
नेतेमंडळींची लोकप्रियता वाढेल. आज भावनेच्या भरात कुणाला दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.

वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : २
कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना घरापासून लांब राेजगार प्राप्त होईल.

मिथुन : शुभ रंग : मोतिया | अंक : ७
आज तुमचे मनोबल वाढवणाऱ्या काही घटना घडतील. कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता राहील. कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. संततीकडून सुवार्ता येतील.

कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी अधिकारी वर्गाची आपल्यावर मर्जी आहेच या भ्रमात राहू नका. बिनचूक कामास प्राधान्य द्या.

सिंह : शुभ रंग : तांबडा|अंक : ८
आज फक्त कष्ट करीत राहा, फळाची अपेक्षा मात्र उद्याच करा. आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ९
व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागेल. वैवाहिक जीवनात संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील.

तूळ : शुभ रंग : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ५
आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी| अंक : ३
सगळी महत्त्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा. हितशत्रू मित्रांमधेच लपले असतील. सतर्क राहा.

धनू : शुभ रंग : मरून| अंक : ६
नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध होतील. कलेच्या क्षेत्रात नवोदितांना संधी मिळेल.

मकर : शुभ रंग : पांढरा| अंक : २
रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. व्यग्र दिवस.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
बऱ्याच दिवसांनी काही जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. सभा-संमेलनात तुमचे वक्तृत्व प्रभावी होईल.

मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : १
समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील. आज जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल. छान दिवस.

बातम्या आणखी आहेत...