आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 6 जून रोजी मघा नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
पारिवारीक सुखात वृध्दीच होईल. वाहन वास्तुविषयी खरेदी विक्री फायद्यातच राहील. मुलांना शिस्त लावा.

वृषभ : शुभ रंग : मरून | अंक : ९
आज कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत कराल. गृहीणींना आज गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.

मिथुन : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
नोकरीच्या ठीकाणी बढती बदलीच्या बातम्या येतील. विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत.

कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
व्यवसायात उत्तम आर्थिक यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

सिंह : शुभ रंग : केशरी | अंक : ३
आज आपलेच खरे करण्याकडे तुमचा कल राहील. घाईगर्दीत आज काही चुकीचे निर्णय घेतले जातील.

कन्या : शुभ रंग : लाल | अंक : १
आज काही दूरचे नातलग संपर्कात येतील. मोठेपणा जपण्यासाठी खर्च कराल. वाणीत मृदुता असावी.

तूळ : शुभ रंग : निळा| अंक : २
आज उंची राहणीमानाकडे कल राहील. यशस्वी व्यक्तींच्या सहवासात तुमच्या इच्छाआकांक्षा वाढतील.

वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
नोकरीच्या ठीकाणी काही मनाजोगत्या घटना घडतील. तुमचे कामातील समर्पण वरीष्ठांना प्रभावीत करेल.

धनु : शुभ रंग : भगवा| अंक : ५
अध्यात्मिक मार्गात असणाऱ्यांना उपासनेचे फळ मिळेल. धंद्यातील पेचप्रसंग यशस्वीरीत्या सोडवाल.

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : २
कार्यक्षेत्रात आज काही मनाविरूध्द घटना घडतील. आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका.

कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
आज धंद्यातील आवक जावक सारखीच राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा आज पूर्ण होतील.

मीन : शुभ रंग : क्रिम| अंक : ३
काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे.तुम्हाला विश्रांतीची पण गरज आहे. येणी वसूल होतील.

बातम्या आणखी आहेत...