आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 6 सप्टेंबर रोजी मघा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शिवा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील. व्यस्त दिवस.

वृषभ : शुभ रंग : मरून | अंक : ९
नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे वाटेल. कामावर दांडी मारून थोडं करमणुकीस प्राधान्य.

मिथुन : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
सामाजिक कार्यात मानसन्मान वाढेल. कुटुंबियांना अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी कराल.

कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
आज एखादी गुप्त बातमी समजेल. गृहिणींनी झकाली मूठ झकालीच ठेवणे गरजेचे आहे.

सिंह : शुभ रंग : केशरी | अंक : ३
राशीच्या व्ययस्थानातून होणारे चंद्रभ्रमण अनावश्यक मिळवून देईल. आज भाग्योदयाकडे वाटचाल होईल.

कन्या : शुभ रंग : लाल | अंक : १
मन काहीसे चंचल राहील. काम कमी व धावपळच जास्त होईल. आज विरोधकांना कमजोर समजू नये.

तूळ : शुभ रंग : निळा| अंक : २
पैसा येण्याइतकेच पैसा जाण्याचेही मार्ग प्रशस्त असतील. चैनी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे.

वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता| अंक : ४
पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मित्रमंडळींत मोठेपणा मिळेल. अनपेक्षित लाभ होतील.

धनु : शुभ रंग : भगवा| अंक : ५
आज नाकासमोर चालणे हिताचे राहील. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येतील. मित्रांच्या नादी लागूच नका.

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : २
कार्यक्षेत्रात आज महत्त्वपूर्ण निर्णय घेताना अनुभवी मंडळींचा सल्ला घेणे गरजेचे राहील. धाडस टळा.

कुंभ : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
भागीदारी व्यवसायात काही मतभेद होतील. देण्याघेण्याच्या व्यवहारात पारदशर्कता ठेवा.

मीन : शुभ रंग : क्रिम| अंक : ३
आज काही विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. चांगली वैचारीक देवाणघेवाण होईल. विचार प्रगल्भ होतील.

बातम्या आणखी आहेत...