आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोमवार 7 फेब्रुवारी रोजी अश्विनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शुभ नावाचा खास योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील दिवस...
मेष : शुभ रंग : मरून| अंक : ५
आज तुमचा कामातील उरक चांगला राहील. मुले मनापासून अभ्यास करतील. तब्येत उत्तम राहील.
वृषभ : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ८
जमाखर्चाचा मेळ बसवताना नाकी नऊ येतील. परदेशाशी संबंधीत व्यवसाय आज तेजीत चालतील.
मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ४
एखादा अनपेक्षित लाभ संभवतो. आज ईच्छापूर्तीचा दिवस असल्याने आपले विचारही सकारात्मक ठेवा.
कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ७
आज कामाच्या ठीकाणी काही बिकट प्रसंग सहजच सोडवाल. आज वडीलांनी दिलेले सल्ले डावलू नका.
सिंह : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
महत्वाच्या कामांना विलंब होईल. तरूणांनी कुसंगत टाळावी. ज्येष्ठांना सत्संगातुनच मन:शांती मिळेल.
कन्या : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
कंटाळवाणा दिवस, कामाचा डोंगर वाढत जाईल. मोफत सल्लागार मंडळी भलतेच बोअर करतील.
तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ७
ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत कष्ट करण्याची तुमची तयारी असेल. आज घरी पत्नी आतुरतेने वाट पहात असेल.
वृश्चिक : शुभ रंग : केशरी| अंक : २
नोकरदारांना आज ओव्हर टाईम करावा लागेल. ज्येष्ठांना आज काही आरोग्याच्या तक्रारींना तोंड द्यावे.
धनु : शुभ रंग : निळा | अंक : ८
रसिक मडळी जिवाची मुंबई करतील. प्रेम प्रकरणे फुलतील, बहरतील. आरोग्य उत्तम साथ देईल.लागेल.
मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : १
कितीही पैसा आला तरी कमीच पडेल. मुलांचे लाड आवरते घ्या, त्यांच्या शिस्तीस प्राधान्य देणे गरजेचे.
कुंभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ९
आज एखाद्या कामासाठी शेजाऱ्यांची मदत होइल.मातोश्रींशी काही मतभेद संभवतात. व्यस्त दिवस.
मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
आज काही येणी असतील तर वसूल होतील. प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. छान दिवस.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.