आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 7 नोव्हेंबर रोजी अश्विनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजची ग्रहस्थिती सिद्धी नावाचा शुभ योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष | शुभ रंग आकाशी, शुभ अंक : 1
आज तुमची तब्येत काहीशी नरमच असेल. मन हळवे करणारा एखादा प्रसंग घडेल. जशास तसे या धोरणाने वागा. क्षुल्लक गोष्ट फार मनाला लावून घेऊ नका.

वृषभ | शुभ रंग :पिस्ता, शुभ अंक : ९
अत्यावश्यक देणी चुकवावी लागतील. दूरच्या प्रवासात आपले मौल्यवान ऐवज सांभाळा. कठोर बोलण्याने नाती दुरावतील. आज क्षणिक मोहात अडकू नका.

मिथुन | शुभ रंग :निळा, शुभ अंक : २
जसे चिंताल तसे होईल. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस असून तुमची काही अपुरी स्वप्ने साकार होतील. व्यावसायिकांचे कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. छान दिवस.

कर्क | शुभ रंग:मोरपंखी, शुभ अंक : ४
उद्योग-धंद्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य राहील. अधिकार योग चालून येतील. हाताखालचे लोक अदबीने वागतील. म्हणाल ती पूर्व.

सिंह | शुभ रंग: मोतिया, शुभ अंक : ४
आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. महत्त्वाच्या घरगुती प्रश्नांत वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. वाहतुकीचे नियम मोडू नका. दंड भरावा लागेल.

कन्या | शुभ रंग:भगवा, शुभ अंक : ८
नवीन ओळखीत लगेच विश्वास टाकू नका. आज मित्रही दगा देतील. कार्यक्षेत्रातही सावधगिरीने पावले टाकणे गरजेचे आहे. गाडी चालवताना स्टंट नकोत.

तूळ | शुभ रंग:स्ट्रॉबेरी, शुभ अंक : ५
व्यवसायात वाढत्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वादविवादात आपलीच मते इतरांवर लादू शकाल. आज वैवाहिक जीवनात गोडीगुलाबी राहील.

वृश्चिक | शुभ रंग:राखाडी, शुभ अंक : ३
काही जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ मंडळींना काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल.

धनू | शुभ रंग:मरून, शुभ अंक : ६
आज उच्च राहणी व उच्च विचारसरणी असे तुमचे धोरण राहील. व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्याल. गृहिणी आज पार्लरसाठी आवर्जून वेळ काढतील. आज सहकुटुंब चैन.

मकर | शुभ रंग: निळा, शुभ अंक : ७
धंद्यात येणी वसूल होतील. कार्यक्षेत्रात आज स्वत:चे महत्त्व सिध्द करू शकाल. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घेण्याची कला आज तुम्हाला चांगलीच जमेल.

कुंभ | शुभ रंग:सोनेरी, शुभ अंक : ३
दिवसाच्या पूर्वार्धातच काही येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. नवीन व्यावसायिकांचा उत्साह वाढवणाऱ्या काही घटना घडतील. आज प्रवासाची दगदग टाळावी.

मीन | शुभ रंग: लाल, शुभ अंक : ९
कार्यक्षेत्रातील तुमचे महत्त्व वाढेल. इतरांस न झेपणारी कामे सहजच पूर्ण कराल. व्यापाऱ्यांची आवक मुबलक राहील. तुमच्यातील मीपणा वाढण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...