आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

7 सप्टेंबर, सोमवारी मेष राशीमध्ये चंद्र आणि मंगळाची युती जुळून आल्यामुळे महालक्ष्मी योग तयार होत आहे. या योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होऊ शकतो. या पाच राशीच्या लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. जॉब आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल. या व्यतिरिक्त इत्तर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : ८
विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचूक ठरतील.

वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : ४
जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. दूरच्या प्रवासात खोेळंबा होईल. कलाकारांना विदेशात प्रसिध्दी मिळेल.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ६
नातलग जवळ येतील. आज पैसा पुरेसा असल्याने मनासारखा खर्च करता येतील. आज आनंदी दिवस.

कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ७
नोकरीच्या ठीकाणी आज वरीष्ठांचे दडपण राहील. काही अटीतटीचे प्रसंग चतुराईने पार पाडावे लागतील.

सिंह :शुभ रंग : मरून|अंक : ९
महत्वाच्या कामांना विलंब होण्याची शक्यता आहे. आज हाती असलेले पैसे जपून वापरा. व्यस्त दिवस.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ६
कार्यक्षेत्रात मनाविरूध्द घटना घडण्याची शक्यता आहे. अशावेळी मानसिक संतूलन ढळू देऊ नका.

तूळ : शुभ रंग : आकाशी|अंक : ८
आपले मत इतरांना पटवून देऊ शकाल. वैवाहिक जिवनात एकमत असून कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ४
नोकरीच्या ठीकाणी प्रामाणिकमणे काम कराल.एखादा महत्वाचा निर्णय चुकण्याची शक्यता आहे. सतर्क रहा.

धनु : शुभ रंग : भगवा|अंक : ३
मुलांच्या बाबतीत काही योग्य निर्णय घ्यावे लागतील. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनची चाहूल लागेल.

मकर : शुभ रंग : पिवळा|अंक : ५
स्थावरा विषयी रखडलेल्या कामांना गती मिळेल. मानसिक शांतता लाभेल व आरोग्य उत्तम राहील.

कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : १
मित्रपरीवार वाढेल. कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करताना आज सावध रहा.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : २
उच्चशिक्षितांना परदेशगमनाच्या संधी दृष्टीक्षेपात येतील. आज दानधर्म कराल.