आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 8 फेब्रुवारी रोजी मूळ नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : जांभळा| अंक : ६
कायदा मोडल्यास दंड होईल. गृहिणींचा आज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेलही.

वृषभ : शुभ रंग : निळा| अंक : ८
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. संध्याकाळी एखादे आर्थिक नुकसान संभवते. उधारी-उसनवारी टाळा.

मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ९
नकळत झालेल्या चुकींमुळे आर्थिक नुकसान सोसावे लागेल. दैनंदिन कामातही काही अडथळ्यांना तोंड द्यावे लागेल. सांसारिक मतभेद संध्याकाळी मिटतील.

कर्क : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
गृहसौख्याचा दिवस असून आज कुटुंबीयास पुरेसा वेळ द्याल. काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील.

सिंह : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ५
मुलांचे वाढते हट्ट पुरवावे लागतील. गृहिणींना रिकाम्या गप्पांसाठी अजिबात वेळ मिळणार नाही.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ३
आज घरात आधुनिक सुखसुविधांसाठी खर्च कराल. टेलिफोन व लाइट बिलेही भरावी लागणार आहेत.

तूळ : शुभ रंग : पांढरा| अंक : २
आवक मनाजोगती असेल. तुमची मन:स्थिती उत्तम असेल. आज जोडीदाराची साथ मोलाची राहील.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी| अंक : १
आज जोखमीची कामे टाळलेली बरी. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. कायद्याची चौकट मोडू नका.

धनू : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
घरात काहीतरी कारणाने वडीलधाऱ्यांंशी मतभेद होऊ शकतात. आज तुम्ही फक्त कर्तव्यास प्राधान्य द्याल.

मकर : शुभ रंग : केशरी| अंक : ४
अधिकार वापरण्याच्या योग्य संधी चालून येणार आहेत.आज मित्रमंडळींबरोबर मात्र काहीतरी बिनसणार आहे.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ३
एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल व त्या संधीचे तुम्ही सोने कराल. आनंदी व उत्साही दिवस.

मीन : शुभ रंग : क्रीम| अंक : ९
नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढणार आहे. वरिष्ठ गोड बोलून तुमच्याकडून कामे करून घेतील. आज प्रकृतीकडे दुर्लक्ष नको.

बातम्या आणखी आहेत...