आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभ योगामध्ये होत आहे आठवड्यातील पहिल्या दिवसाची सुरुवात

सोमवार 8 जून 2020 रोजी पूर्वाषाढा नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि चांगली बातमी मिळू शकते. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांची कामामध्ये मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना आर्थिक व्यवहारात फायदा होईल. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 8 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

  • मेष: शुभ रंग : मरून | अंक : ३

व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील.

  • वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : १

नोकरीच्या ठीकाणी अधिकारी वर्गाची आपल्यावर मर्जी आहेच या भ्रमात राहू नका. सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे अाहे. वैवाहीक जिवनांत संध्याकाळी मतभेद.

  • मिथुन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २

नोकरीत वरीष्ठ गोड बोलून राबवून घेतील. भवना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल. वैवाहीक जिवनांत जोडीदाराची मते विचारात घेणे गरजेचे आहे.

  • कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ४

नोकरीच्या ठीकाणी वाढीव जबाबदाऱ्या स्विकाराव्या लागतील. संध्याकाळी डॉक्टरांना भेटीचे योग आहेत.

  • सिंह : शुभ रंग : भगवा | अंक : ५

आर्थिक स्थिती उत्तम असल्याने मन:सवास्थ्य चांगले असेल. सहकुटुंब चैन व मनोरंजनास प्राधान्य द्याल.

  • कन्या : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ६

आज कौटुंबिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत.

  • तूळ : शुभ रंग : क्रिम | अंक : ७

पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेत.

  • वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९

दुपारनंतर विविध मार्गाने आर्थिक लाभ होणार आहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागतील.

  • धनू : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ४

आज स्वत:चे लाड पुरवण्यासाठी  खर्च कराल. जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवायचा प्रयत्न कराल.

  • मकर : शुभ रंग : निळा | अंक : ८

सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वी उरकून मोकळे व्हा.आज स्वावलंबन महत्वाचे राहील. खर्च वाढणार आहे.

  • कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ९

कार्यक्षेत्रात प्रगतीचा आलेख चढता असेल. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी चालून येतील.

  • मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरीष्ठांना प्रभावित करेल. आज केवळ स्वप्नरंजनापेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...