आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 8 मार्च रोजी पूर्वाषाढा नक्षत्र यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 5 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 7 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : पांढरा| अंक : १
कंटाळवाणा दिवस, कामाचा पसारा आवाक्याबाहेर जाईल. मोफत सल्लागार मंडळी बोअर करतील.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
व्यवसायात ध्येयपूर्तीसाठी अविश्रांत कष्ट करण्याची तुमची तयारी असेल. आज लवकर घरी जा, पत्नी आतुरतेने वाट पाहत असेल.

मिथुन : शुभ रंग : हिरवा| अंक : ७
नोकरदारांना आज ओव्हर टाइम करावा लागेल. ज्येष्ठांना काही आरोग्याच्या तक्रारींना तोंड द्यावे लागणार आहे. जबाबदाऱ्या स्वीकारूच नका.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : ८
रसिक मडळी जिवाची मुंबई करतील. प्रेमप्रकरणे फुलतील, बहरतील. आरोग्य उत्तम साथ देईल.

सिंह : शुभ रंग : क्रीम|अंक : ९
आज तुम्हाला कितीही पैसा आला तरी तो कमीच पडेल. मुलांचे लाड आवरते घ्या. शिस्तीस प्राधान्य देणे गरजेचे.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी|अंक : ५
आर्थिक व्यवहार दोन दिवस पुढे ढकला. महत्त्वाच्या चर्चेत डोके शांत ठेवा. शेजारधर्म जपाल.

तूळ : शुभ रंग : सोनेरी| अंक : ७
फक्त वाणीत गोडवा ठेवाल तर कामे सोपी होतील. कार्यक्षेत्रात श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ६
आज तुमचा कामातील उरक चांगला राहील. तब्येत ठणठणीत राहील. मुले अभ्यास गांभीर्याने करतील.

धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : १
जमाखर्चाचा मेळ बसवताना तारेवरची कसरत होईल. इम्पोर्ट-एक्स्पोर्टचे व्यवसाय तेजीत चालतील.

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : ४
एखादा अनपेक्षित लाभ संभवतो. आज इच्छापूर्तीचा दिवस असल्याने आपले विचारही सकारात्मक ठेवा.

कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : ३
कामाच्या ठिकाणी काही बिकट प्रसंग सहजच सोडवाल. वडिलांनी दिलेले सल्ले डावलू नका.

मीन : शुभ रंग : भगवा| अंक : २
काही महत्त्वाच्या कामांना विलंब होईल. तरुणांनी कुसंगत टाळावी. ज्येष्ठांना आज सत्संगातूनच मन:शांती मिळेल.

बातम्या आणखी आहेत...