आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 9 मे 2022 रोजी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये नशिबाची साथ मिळेल आणि लाभ होईल. वरिष्ठ अधिकारी आणि इतर मोठ्या लोकांची कामामध्ये मदत मिळेल. मोठे काम पूर्ण होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकासांठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : भगवा | अंक : ४
स्थावर इस्टेटी विषयी रखडलेली कामे गती घेतील. नव्या ओळखी होतील. मौल्यवान खरेदी कराल.

वृषभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ३
महत्वाची कामे विलंबाने होतील. मुलांचे वाढते हट्ट पुरवावे लागतील. भावनेच्या भरात वचने देऊ नका.

मिथुन : शुभ रंग : क्रिम| अंक : ५
नव्या ओळखीतून व्यवसायवृध्दी होईल. महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या करताना मात्र आज सावध रहा.

कर्क : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
विविध मार्गाने आर्थिक लाभ होतील. व्यवसायात पूर्वी घेतलेले निर्णय अचूक ठरतील. छान दिवस.

सिंह : शुभ रंग : पांढरा| अंक : ८
नोकरीच्या ठीकाणी वढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. दूरच्या प्रवासात खोेळंबा होईल. संयम ठेवा.

कन्या : शुभ रंग : डाळिंबी| अंक : ३
मित्र दिलेले शब्द पाळतील. काही कारणाने दूरावलेले नातलग जवळ येतील. असलेले पैसे जपून वापरा.

तूळ : शुभ रंग : पिस्ता| अंक : १
आज भावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होईल. काही अटीतटीच्या प्रसंगांना चतुराईने तोंड द्यावे लागेल.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
उच्चशिक्षितांना विदेश गमनाचे वेध लागतील. महत्वाचे निर्णय घेताना आज काहीशी द्विधा मनस्थिती होणार आहे.

धनु : शुभ रंग : हिरवा | अंक : ६
कार्यक्षेत्रात काही मनाविरूध्द घटना घडू शकतील. अशावेळी मानसिक संतूलन ढळू न देणे गरजेचे आहे.

मकर : शुभ रंग : सोनेरी| अंक : ७
व्यावसायात महत्वाचे करार मदार यशस्वी होतील. वादविवादात आपल्याच मतावर ठाम राहू शकाल.

कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : २
आज नोकरीच्या ठीकाणी प्रामाणिकमणे काम कराल.एखादा महत्वाचा निर्णय चुकण्याची शक्यता आहे.

मीन : शुभ रंग : मरून | अंक : १
ज्येष्ठ मंडळींनी आज आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. काही उष्णतेचे विकार हैराण करतील.

बातम्या आणखी आहेत...