आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 9 नोव्हेंबर 2020 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. सोमवारी आश्लेषा नक्षत्र असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील सोमवार...

मेष : शुभ रंग : मरून| अंक : १
आज ऐशआराम करण्याकडे कल राहील. संध्याकाळी एखाद्या करमणुकीच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : २
आज तुमच्या गृहसौख्यात वृद्धीच होणार आहे. वाहन वास्तुविषयी खरेदी-विक्री फायद्यातच राहील.

मिथुन : शुभ रंग : पांढरा| अंक : ६
आज तुम्हाला काही अप्रिय माणसांचा सहवास सहन करावा लागेल. कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा नकाे. आज स्वावलंबन महत्त्वाचे राहील.

कर्क : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
विरोधकांचा विरोध मावळेल. कार्यक्षेत्रात योग्य हितसंबंध निर्माण होतील. पुरेशी बचत करता येईल.

सिंह : शुभ रंग : भगवा| अंक : ५
महत्त्वाच्या चर्चेत अग्रेसर राहाल. कुणी केलेल्या खोट्या स्तुतीनेही भारावून जाल. मित्रांना पार्टी द्याल.

कन्या : शुभ रंग : हिरवा| अंक : ४
आज तुम्ही आपले आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ व पैसा खर्च कराल. सहकुटुंब प्रवास कराल.

तूळ : शुभ रंग : पांढरा|अंक : ७
अर्धवट उपक्रम नव्यानेे सुरू करता येतील. अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होईल. गृहलक्ष्मी प्रसन्न असेल.

वृश्चिक : शुभ रंग : नारिंगी|अंक : ९
महत्त्वाकांक्षी व्यक्तीचा सहवास लाभेल. ध्येयपूर्तीकडे वाटचाल होईल. एखाद्या मित्रास मदत करावी लागेल.

धनु : शुभ रंग : आकाशी| अंक : ८
कार्यक्षेत्रात बिकट प्रसंग यशस्वीपणे हाताळाल. तुमच्या प्रामाणिक मेहनतीस नशिबाची साथ मिळेल.

मकर : शुभ रंग : मांरपंखी| अंक : ४
खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. रुग्णांनी पथ्य पाणी सांभाळावे. बेकायदेशीर कृत्ये अंगाशी येतील.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी|अंक : १
जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील.

मीन : शुभ रंग : पिस्ता|अंक : ३
बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. कामगारांच्या रास्त मागण्या मान्य होतील. ज्येष्ठ मंडळींनी फक्त आपल्या तब्येतीस जपावे, जास्त दगदग टाळावी.

बातम्या आणखी आहेत...