आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शुभ संयोग:खरेदी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी 2 शुभ मुहूर्त; 4 ऑक्टोबरला महानवमी, 5 तारखेला विजयादशमीचा स्वयंसिद्ध मुहूर्त

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू पंचांगानुसार, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची नवमी 4 ऑक्टोबरला आहे. दसरा दुसऱ्याच दिवशी म्हणजे 5 तारखेला आहे. खरेदी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी दोन्ही दिवस खूप खास आहेत. नवरात्रीची नवमी तिथी आणि दसरा हा प्रत्येक बाबतीत विशेष मानला जातो.

या दोन्ही दिवशी मोठ्या आणि विशेष कामाची सुरुवात केली जाते. नवमी तिथी देवीच्या महापूजेचा दिवस आहे. त्याचबरोबर दसरा स्वयंसिद्ध मुहूर्त मानले जाते. त्यामुळे हे दोन दिवस अनेक अर्थाने खास राहतात.

यावेळी हे दिवस 4 आणि 5 तारखेला
पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र सांगतात की, यंदा नवरात्रीची नवमी तिथी 4 तारखेला दुपारी अडीच वाजेपर्यंत राहील. त्यानंतर दशमी सुरू होईल. जी 5 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत राहील.

धार्मिक कार्य म्हणजे व्रत, पूजा, स्नान आणि दानासाठी या तिथींना सूर्योदयानुसार मानले जाते. परंतु खरेदी किंवा कोणत्याही विशेष कामाच्या सुरुवातीसाठी, त्या वेळी फक्त तिथी असणे पुरेसे आहे.

महापूजेचे दिवस आणि स्वयंसिद्ध मुहूर्त
डॉ मिश्र सांगतात की, ज्योतिषशास्त्रात रवियोगाला शुभ मुहूर्त म्हटले आहे. म्हणजेच या मुहूर्तामध्ये सर्व प्रकारची खरेदी आणि नवीन सुरुवात करणे फायदेशीर आहे. हा शुभ योग 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी असेल.

नवमीलाही महापूजेचा दिवस म्हणतात. या दिवशी महत्त्वाच्या कामांना सुरुवात केली जाते. त्याच वेळी, ज्योतिष ग्रंथांमध्ये विजयादशमी म्हणजेच दसऱ्याला स्वयंसिद्ध मुहूर्त म्हटले आहे. म्हणजेच या तारखेला केलेले काम अपूर्ण राहत नाही, ते पूर्ण होते. दसऱ्याच्या दिवशी मालमत्ता, वाहन आणि सर्व प्रकारची विशेष खरेदी करण्याचेही विधान आहे.

श्रवण नक्षत्र आणि दशमीचा शुभ संयोग
5 ऑक्टोबरला श्रवण नक्षत्र आणि दशमी तिथीचा शुभ संयोग जुळून येत आहे. यामध्ये केलेले कार्य विजय आणि यश मिळवून देतात. त्यामुळे दसऱ्याला मालमत्ता, फर्निचर व इतर महत्त्वाच्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. या दिवशी वाहन खरेदीसाठी विशेष शुभ मुहूर्त असेल.

बातम्या आणखी आहेत...