आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्योतिषमध्ये सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि आणि राहू-केतू हे नऊ ग्रह सांगण्यात आले असून प्रत्येक ग्रह वेगवेगळे फळ प्रदान करतो. कुंडलीमध्ये या ग्रहांची स्थिती ठीक नसल्यास व्यक्तीला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. ग्रह दोषामुळे खूप कष्ट करूनही यश प्राप्त होत नाही. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 9 ग्रहांचे 9 मंत्र सांगण्यात आले आहेत. या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे दुर्भाग्य दूर होऊ शकते. येथे जाणून घ्या, मंत्र आणि जप करण्याचा योग्य विधी...
मंत्र जपाचा सामान्य विधी
> ज्या ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी मंत्र जप करावयाचा आहे, त्या ग्रहाचे विधिव्रत पूजन करावे.
> पूजा घरामध्ये किंवा एखाद्या मंदिरात करू शकता. आसनावर बसून पूजा करा आणि मूर्तीवर फुल, तांदुळ, वस्त्र, कुंकू आणि माळ अर्पण करून नैवेद्य दाखवावा. धूप-दीप लावावा.
> पूजा करताना संबंधित ग्रहाच्या मंत्राचा जप करावा. मंत्र जपाची संख्या कमीत कमी 108 असावी. जप करण्यासाठी रुद्राक्षाच्या माळेचा उपयोग करू शकता.
सूर्य मंत्र - ऊँ सूर्याय नम:
> सकाळी लवकर उठावे आणि स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देऊन या मंत्राचा जप करावा. या मंत्राच्या शुभ प्रभावाने पद, यश, सामाजिक प्रतिष्ठा, आरोग्य आणि अपत्य सुख प्राप्त होऊ शकते.
चंद्र मंत्र - ऊँ सोमाय नम:
> या मंत्र जपाने मानसिक अडचणी दूर होतात. पोट आणि डोळ्यांच्या आजारापासून आराम मिळतो.
मंगळ मंत्र - ऊँ भौमाय नम:
> या मंत्र जपाने भूमी, संपत्ती आणि लग्नाशी संबंधीत बाधा दूर होऊ शकतात.
बुध मंत्र - ऊँ बुधाय नम:
> हा मंत्र बुद्धी आणि धनलाभ प्रदान करतो. घर आणि व्यवसायातील आर्थिक अडचणी दूर करून निर्णय क्षमता वाढवतो
गुरु मंत्र - ऊँ बृहस्पतये नम:
> या मंत्र जपाने वैवाहिक जीवनातील सुख कायम राहते. सौभाग्य वाढते.
शुक्र मंत्र - ऊँ शुक्राय नम:
> या मंत्र जपाने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होऊ शकतात.
शनि मंत्र - ऊँ शनैश्चराय नम:
> या मंत्र जपामुळे शनिदेवाची कृपा प्राप्त होते. शनिदेव भक्ताच्या सर्व समस्या दूर करतात.
राहु मंत्र - ऊँ राहवे नम:
> हा मंत्र जप मानसिक तणाव आणि वाद दूर करतो.
केतु मंत्र - ऊँ केतवे नम:
> या मंत्र जपाने नात्यामधील तणाव दूर होतो आणि जीवनात सुख-शांती वाढते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.