आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामंगळ ग्रह 7 एप्रिल रोजी दुपारी 4च्या सुमारास राशी बदलेल. हा ग्रह मकर राशीतून बाहेर पडून कुंभ राशीत येईल. यापूर्वी 26 फेब्रुवारीला या ग्रहाने मकर राशीत प्रवेश केला होता. आता 17 मे पर्यंत कुंभ राशीत राहील. मकर राशीत शनी आणि कुंभ राशीत मंगळ असल्यामुळे 29 एप्रिलपर्यंत या दोन ग्रहांचा द्विर्द्वादश योग राहील. या तारखेला शनि आपली राशी बदलून पुन्हा कुंभ राशीत मंगळासोबत येईल. येथे 17 मे पर्यंत राहील. अशा प्रकारे 40 दिवस शनि आणि मंगळाचा अशुभ योग राहील.
सोन्या-चांदीचे भाव वाढू शकतात
मंगळाचे संक्रमण रिअल इस्टेट आणि उद्योग क्षेत्रात तेजीचे संकेत देत आहे. देशाच्या सुरक्षेसाठी पैसा खर्च केला जाईल. मालमत्तेची खरेदी-विक्री वाढेल. जमिनीच्या किमतीतही अचानक चढ-उतार होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव असेल. नवीन करार काळजीपूर्वक करावे लागतील. सोन्या-चांदीचे भाव वाढू शकतात. कापूस आणि कपड्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. अग्नी तत्वाशी संबंधित म्हणजेच पेट्रोल, डिझेलशी संबंधित वस्तूंच्या किमतीबाबत मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात.
अशुभ योगामुळे वाढतील अडचणी
शनि-मंगळ आणि द्वादश योग जुळून आल्याने अनेक लोकांच्या समस्या वाढू शकतात. मालमत्तेचे नुकसान होऊ शकते. व्यवहार आणि गुंतवणुकीबाबत वाद होण्याची शक्यता आहे. अनेक लोकांसाठी हा काळ तणावपूर्ण असेल. धनहानी आणि कर्ज वाढू शकते. आजार वाढतील. तथापि, या ग्रहांमुळे, नवीन षडयंत्र आणि योजना देखील बनतील. राजकारणाशी संबंधित बदल होतील. शनि-मंगळाच्या योगात नवीन कामाची सुरुवात करणे टाळावे. अन्यथा, अडचणी वाढू शकतात.
हनुमान पूजेने कमी होईल प्रभाव
मंगळाचा अशुभ प्रभाव टाळण्यासाठी मधाचे सेवन करून घराबाहेर पडावे. लाल चंदनाचा टिळा लावावा. हनुमानाची लाल फुलांनी पूजा करा. शेंदूर लावावा. मंगळवारी तांब्याच्या भांड्यात धान्य भरून हनुमान मंदिरात दान करावे. मातीच्या भांड्यात अन्न खावे. मसूर डाळ दान करा. पाण्यात थोडेसे लाल चंदन मिसळून स्नान करा. या उपायांच्या मदतीने मंगळाचा अशुभ प्रभाव कमी केला जाऊ शकतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.