आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा11 एप्रिल रोजी राहू-केतूने राशी बदलल्याने आता लोकांच्या जॉब आणि व्यवसायात बदल घडू शकतात. या ग्रहांमुळे होणारे बदल मोठे आणि महत्त्वपूर्ण आहेत. त्यांचा प्रभाव पुढील दीड महिना राहणार आहे. राहूमुळे अनेक लोकांच्या तब्येतीतही सुधारणा होऊ लागेल. या दोन ग्रहांची स्थिती सर्व राशींना दैनंदिन व्यवहारात अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा संकेत देत आहे. नवीन योजना तयार होतील आणि त्यावर काम सुरू होईल परंतु काही अडथळे देखील येऊ शकतात.
18 वर्षांनंतर पुन्हा मेष आणि तूळ राशीत राहू-केतू
१८ वर्षांनंतर राहू-केतू पुन्हा मेष आणि तूळ राशीत आले आहेत. हे दोन्ही ग्रह १८ महिने एकाच राशीत राहतात. हे नेहमी वक्री राहतात. 18 वर्षांपूर्वी म्हणजे 2003-04 मध्ये हे दोन्ही ग्रह मेष आणि तूळ राशीत होते. ज्योतिषांच्या मते, दोन्ही ग्रहांच्या राशी बदलाचा परिणाम सर्व राशींवर तसेच देश आणि जगावर होईल. पुरीचे ज्योतिषी डॉ.गणेश मिश्र सांगतात की, मंगळ हा मेष राशीचा स्वामी आहे. मंगळ आणि राहू हे ज्योतिषशास्त्रात शत्रू मानले जातात. त्याच वेळी, तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि केतूशी शुक्राचे कोणतेही वैर नाही.
मोठे राजकीय बदल आणि महागाई वाढीचा योग
राहूची अधिष्ठात्री देवता काळ आहे आणि प्रत्याधी देवता सर्प आहे, त्यामुळे राहूमुळेच कुंडलीत कालसर्प योग तयार होतो. राहू मेष राशीत असल्यामुळे अपघात आणि नैसर्गिक आपत्ती वाढतील. मोठे राजकीय बदल होतील. महागाई कायम राहील. तणाव वाढेल. खोट्या बातम्या पसरतील. जास्त उष्णता आणि कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. आजार वाढण्याची आणि पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
राहू-केतू : स्थान बदल आणि धनलाभ
राहू-केतूमुळे लोकांच्या कामाच्या ठिकाणी आणि राहणीमानात बदल होतो. या ग्रहांमुळे स्थान बदल आणि धनलाभही होतो. राहूच्या शुभ प्रभावाने बुद्धी तीक्ष्ण होते, परंतु अशुभ प्रभावाने गोंधळ निर्माण होतो. बुद्धिमत्तेशी संबंधित म्हणजेच योजना बनवणे आणि कूटनीती करणे हे देखील राहूमुळेच होते. हा ग्रह राजकारण करवून घेतो.
देशाच्या सीमांवरही राहूचा प्रभाव राहतो. त्यामुळे देशाच्या सीमांशी संबंधित बदलही याच ग्रहामुळे होतात. केतूमुळे साहसी काम होतात. केतूमुळे कुटुंबात हक्क आणि मालमत्तेबाबत संघर्षाची परिस्थितीही निर्माण होऊ शकते.
मेष राशीमध्ये राहू : कामात अचानक बदल
मेष राशीत राहूच्या आगमनाने कामाच्या पद्धतीत अचानक बदल होतो. वाद होतात. लोक अधिक आक्रमक होतील. लोक मुत्सद्देगिरी आणि कारस्थान करतील. राहूच्या प्रभावामुळे अधिक गोंधळ होईल. गोंधळामुळे अपघात होतील. वाद आणि तणावाचे प्रसंगही निर्माण होतील.
राहूमुळे राजकारणाशी संबंधित लोकांच्या जीवनात निश्चितच मोठे बदल घडतात. या क्षेत्राशी निगडित लोकही काही षड्यंत्राचे बळी ठरू शकतात. त्यामुळे अशा लोकांनी सावध राहावे. राहूमुळे सर्व राशींच्या आहारात बदल होईल. यामुळे काही लोकांना पोटाशी संबंधित आजारांपासून आराम मिळू शकतो, तर काही लोकांच्या समस्याही वाढू शकतात.
तूळ राशीमध्ये केतू : जोखमीचे निर्णय
केतूचे तूळ राशीतील संक्रमण अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. तूळ शुक्राची राशी असल्याने यामध्ये केतूचे आगमन म्हणजे धैर्य, मुत्सद्दीपणा आणि शक्ती वाढणे. केतूमुळे अनेक लोक व्यवसाय, व्यवहार आणि गुंतवणुकीत जोखमीचे निर्णय घेऊ शकतात. अनेक कामांमध्ये अडथळे व वाद निर्माण होतील. काही लोक गुंतवणुकीचा चुकीचा निर्णय घेऊ शकतात. नोकरदारांचे काम वाढू शकते. अधिक मेहनत करावी लागेल.
या ग्रहांमुळे काही कामांमध्ये आमुलाग्र बदलही होऊ शकतात. केतूच्या प्रभावामुळे काही लोकांच्या कामाचा वेग अचानक वाढू शकतो. त्याच वेळी, चालू असलेले काही काम अचानक बंद होऊ शकते. केतूमुळे उग्रता वाढू शकते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.