आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

साप्ताहिक राशिफळ / 23 ते 29 मार्चपर्यंत ठीक नाही काळ, अनेक लोकांना राहावे लागेल सांभाळून

Aurangabad6 महिन्यांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा

23 ते 29 मार्च दरम्यान चंद्र कुंभ राशीपासून वृषभ राशीपर्यंत जाईल. या दरम्यान चंद्रावर शनी आणि राहू-केतूचा अशुभ प्रभाव राहील. यासोबतच चंद्र शत्रू ग्रहासोबत राहील. अशाप्रकारे चंद्र पीडित झाल्यामुळे लोकांमध्ये अनामिक भीती आणि तणाव राहील. कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. तणावही राहील. ग्रहांच्या या स्थितीचा प्रभाव काही लोकांच्या आरोग्यावरही पडू शकतो. यामुळे संपूर्ण आठवडा प्रत्येकाने सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील हा आठवडा...

 • मेष

राशी स्वामी उच्चीचा असण्याबराेबरच तुमच्यावर दृष्टीही ठेवेल. कार्यामध्ये यश मिळेल आणि तुम्हाला संपत्तीपासून फायदा मिळेल. तुमचे उत्पन्न चांगले राहील परंतु बुधवारी आणि गुरुवारी जास्त खर्च हाेण्याची शक्यता आहे. तुमच्या याेजना अपयशी ठरू शकतात. शुक्रवारपासून वेळ तुमच्या बाजुने असेल.

 • वृषभ

राहुुचे बाैद्धिक क्षमतेमुळे तुम्हाला धन कमावण्यात यश मिळेल आणि तुम्हाला सण-समारंभात सहभागी हाेण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल आणि तुमच्या मुलांकडून सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही वर्चस्व गाजवाल. गुरुवारी आणि शुक्रवारी विराेधक सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

 • मिथुन

राहुुचे गाेचर आणि नवव्या स्थानातील चंद्र तुम्हाला लाभ मिळवून देण्याच्या संधी निर्माण करतानाच प्रभावही वाढेल. तुमचा उत्तम व्यवहार इतरांना आपल्यासाठी उपयुक्त बनवेल. गुरुवारी आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. गूढ विषय जाणून घेण्याची तुमची उत्सुकता असेल. आठवडा सरासरी राहण्याची शक्यता आहे.

 • कर्क

अष्टमेतील चंद्र आठवड्याची सुरुवात खराब करू शकताे परंतु मंगळवारपासून चंद्र मदतनीस ठरेल. जाे पुढे तुमच्या वेळेचे साेने करेल. हा काळ तुमच्या यशस्वीतेचा असेल. नवीन काम मिळण्याची शक्यता आहे आणि सत्संग, धार्मिक कार्यक्रमात जाण्याची संधी मिळेल. मुलांकडून मदत मिळेल.

 • सिंह

चंद्राची पूूर्ण दृष्टी असल्याने आर्थिक प्रकरणामध्ये काेणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही परंतु मंगळवार व बुधवारी अडचण येऊ शकते. हस्तक्षेपापासून दूर रहा व स्वत: प्रयत्न करून स्वत:ला सिद्ध करा. गुरुवारपासून कामाचा विस्तार करण्यात यश मिळेल .प्रतिष्ठीत व्यक्तींची भेट हाेण्याची शक्यता.

 • कन्या

सूर्याची दृष्टी आणि तृतीयेतील चंद्रामुळे उत्पन्नात वाढ हाेईल. जी तुम्हाला माेठी जबाबदारी मिळवून देण्यासाठी सहाय्यभूत ठरेल. बुद्धिमत्तेत अग्रेसर रहाल आणि सहकाऱ्यांवर मात करण्यात यशस्वी व्हाल.कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील आणि सर्वश्रेष्ठ पराक्रम कराल. अचानक लाभ हाेण्याची शक्यता आहे.

 • तूळ

तुमच्या परिस्थितीत सुधारणा हाेईल आणि शनीच्या दृष्टीमुळे तुमच्या रखडलेली कामांना वेग मिळण्याची शक्यता आहे तसेच तुमच्या सकारात्मकतेत वाढ हाेईल. घाईघाईत कामे बिघडण्याची शक्यता असून त्यामुळे वेळ वाया जाईल. वादग्रस्त प्रकरणांमध्ये विराेधक कमजाेर पडतील आणि आठवड्यामध्ये संभाळून रहा.

 • वृश्चिक

चतुर्थेतील चंद्राबराेबरच आठवड्याच्या सुरुवातीला िचंता आणि घबराट हाेईल. अंतर्गत कलहामुळे तुम्हाला जास्त त्रास हाेईल. बुधवारी चांगल्या वातावरणाचा अनुभव घ्याल. पैशाच्या समस्येचे कारण समजेल. शुक्रवारी व शनिवारी कुटुंबाची साथ मिळेल आणि फिरण्याची संधी मिळेल.

 • धनू

गुरु, मंगळ आणि केतु बराेबरच आर्थिक प्रकरणांमध्ये सुधारणा हाेईल आणि सरकारी कामात यश मिळेल. धाेरणात काही बदल करावे लागतील. मंगळवारी आणि बुधवारी समस्या निर्माण हाेऊ शकतात, गुरुवारपासून वेळ तुमच्या बाजुने असेल. शुक्रवारी आणि शनिवारी पैशाची आवक हाेण्याची शक्यता आहे.

 • मकर

राशी स्वामी शनीचे गाेचर आहे. स्थायी संपत्ती वाढवण्याची इच्छा हाेईल. सध्या गुंतवणूक करणे नुकसानीचे ठरू शकते. मंगळवारी कर्ज समस्या दूर हाेतील. बुधवारी कामाचा व्याप जास्त वाढेल. गुरुवारी आणि शुक्रवारी सतर्क रहा. अप्रिय घटनांचा सामना करावा लागेल. शनिवार चांगला ठरेल.

 • कुंभ

बुध आणि चंद्र राशीत राहतील. जास्त लाभदायक ठरणार नाही. अरुची पूर्ण कामे करावी लागू शकतात. पैशाची आवक ठिक राहील. पण मन उदास राहील. महिलांना अतिरिक्त सावधानी बाळगण्याची गरज आहे. अनाेळखी व्यक्तींशी काेणताही व्यवहार करू नका.

 • मीन

शनीचीची दृष्टी आणि सूर्याचे गाेचर असेल. सुरुवातीच्या काही अडचणीनंतर मंगळवारपासून सुधारणा हाेईल. नवीन कामाचे प्रस्ताव मिळतील व उदासिनता संपेल. आर्थिक स्थितीत सुधारणा हाेईल. लाभदायक संपर्क हाेतील. मुलांकडून सुख मिळेल.

0