आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशुभ योगामध्ये होत आहे महिन्यातील पहिल्या दिवसाची सुरुवात
Advertisement
Advertisement

शनिवार 1 ऑगस्ट रोजी मूळ नक्षत्र असल्यामुळे वैधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. या लोकांना वाद आणि व्यर्थ खरचला सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष: शुभ रंग : मोरपिशी | अंक : ८
कार्यक्षेत्रात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी स्वप्नरंजनापेक्षा प्रयत्नांस प्राधान्य देणे गरजेचे आहे. दैवाची साथ आहेच.

वृषभ: शुभ रंग : पांढरा | अंक : १
आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. वैवाहीक जिवनांत किरकोळ वाद संभवतात पण फार ताणून धरु नका. सासूरवाडीकडून काही लाभ होतील.

मिथुन : शुभ रंग : मरून | अंक : ४
कारण नसताना इतराच्या भानगडीत पडण्याचा मोह होईल. पण तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे. आज प्रवासात खोळंबा होईल.

कर्क : शुभ रंग : भगवा | अंक : ८
कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील. इतरांवर विसंबून न रहाता स्वावलंबनाचे धोरण ठेवा.

सिंह : शुभ रंग : गुलाबी| अंक : ७
व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. आज तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील.

कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : ९
वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन केल्यास यशाचा मार्ग सोपा होईल. गृहसैख्य लाभेल.

तूळ : शुभ रंग : हिरवा | अंक : ६
नवीन झालेले परिचय फायदेशीर ठरतील. आज तुम्हाला परिवारासाठी वेळ देणे कठीण जाईल. प्रवास घडतील.

वृश्चिक : शुभ रंग : मोतिया | अंक : २
पतप्रतिष्ठा वाढेल. आज आप्तस्वकीयात तुमच्या शब्दास मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल.

धनू : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १
हट्टीपणावर मात करुन आज संयमाने वागण्याची गरज आहे. जोडीदारास दिलेले शब्द पाळावे लागतील.

मकर : शुभ रंग : निळा | अंक : ३
आपल्या कतृत्वास थोरामोठयांचे अशिर्वाद लाभतील.गृहीणींना आज क्षणभरही उसंत मिळणे कठीण अाहे.

कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ५
जुन्या मित्रमंडळींच्या भेटीने मन ताजेतवाने होईल. अनेक अवघड कामे सोपी होतील. दिवस लाभाचा.

मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ४
आज संमिश्र फळे देणारा दिवस असून आवक जावक समान राहील. शब्द जपून वापरल्यास वाद टाळता येतील.

Advertisement
0