आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवारी, 10 एप्रिलला चंद्र दिवसभर कुंभ राशीत राहिल. शनिवारी पूर्वा भाद्रपद नक्षत्र असल्यामुळे कालदंड नावाचा अशुभ योग जुळत आहे. या योगात अवश्यक कामे करताना जास्त सतर्क राहणे गरजेचे आहे. सकाळी शुक्रने राशी बदलली आहे. या ग्रहाने मीनमधून मेष राशीमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी शनिदेवसाठी तेल आणि काळ्या तिळाचे दान गरजू व्यक्तींना करा. ऊँ शं शनैश्चराय नम:मंत्राचा जप करा. मेष, मिथुन, कन्या, तुळ आणि धनु राशीसाठी आजचा दिवस लाभदायक आहे.
मेष : शुभ रंग : राखाडी| अंक : ६
आपल्या स्वार्थाकडे लक्ष असू द्या. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक तपासा. मोठे आर्थिक व्यवहार टाळा.
वृषभ : शुभ रंग : मरून| अंक : ५
आत्मविश्वासाने नव्या योजना राबवता येतील. पैशाअभावी रखडलेले उपक्रम सुरू करता येतील.नवीन लघुउद्योजकांचे कर्जप्रस्ताव मंजूर होतील.
मिथुन : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३
नोकरीत कामाचा ताण प्रचंड वाढला असला तरी तुमची वाटचाल प्रगतीच्याच दिशेने चालू राहील.
कर्क : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाकावीत. हट्टीपणास लगाम घालून इतरांची मते ऐकून घ्यायची तयारी ठेवा.
सिंह : शुभ रंग : चंदेरी| अंक : २
आज काही अति हुशार मंडळी संपर्कात येतील.
कन्या : शुभ रंग : पांढरा| अंक : १
हार्ड वर्कपेक्षा स्मार्ट वर्क करून लवकर घर गाठाल. चंगळवादी वृत्ती राहील.आज दोघात तिसरा नको.
तूळ : शुभ रंग : नारिंगी|अंक : ६
व्यवसायात उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट कराल. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नास यश निश्चित.
वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी|अंक : ८
नोकरदार मंडळी वरिष्ठांचे मूड सांभाळतील. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभेल. काही गुपिते उघड होतील.
धनू : शुभ रंग : निळा| अंक : ९
अाज अथक परिश्रमांच्या साहाय्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. योग्य माणसे संपर्कात येतील.
मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : ७
नकळत झालेल्या चुकीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकेल. मुले आज अभ्यास सोडून सर्व काही करतील.
कुंभ : शुभ रंग : जांभळा|अंक : ६
आनंदी व उत्साही असा आजचा दिवस असून सर्व कामे विनाव्यत्यय पार पडतील. गृहसौख्याचा दिवस.
मीन : शुभ रंग : क्रीम|अंक : ९
आज रुग्णांनी पथ्यपाण्याची काळजी घ्यायला हवी. . {पं. जयंत कुळकर्णी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.