आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

10 जुलै शनिवारचे ग्रह-नक्षत्र छत्र नावाचा एक शुभ आणि व्याघात नावाचा एक अशुभ योग तयार करत आहेत. यामुळे 3 राशींसाठी दिवस शुभ आणि 8 राशींसाठी सामान्य राहील. या लोकांसाठी जॉब आणि बिझनेसमध्ये ग्रहांचा संमिश्र प्रभाव राहील. काम पूर्ण होण्यात अडचणी निर्मण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर तीन राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळू शकते.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष: शुभ रंग : लाल | अंक : ३
अती श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आज विश्रांतीची गरज भासेल. कुणाकडून येणी असतील वसूलीची शक्यता.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ५
प्रतिष्ठींतांच्या ओळखी आपला स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील. आज पत्नीचे उपदेश ऐकून घेणे गरजेचे.

मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६
सगळयाच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील अशी अपेक्षा करु नका. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नकोत.

कर्क : शुभ रंग : केशरी | अंक : ८
तुम्हाला पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागतील. सज्जनांच्या सहवासात रमाल. भक्तीमार्गात गोडी वाटेल.

सिंह : शुभ रंग : गुलाबी | अंक : २
कष्टांचाही अतिरेक नकाे. ध्येयाच्या मागे धावताना तब्येतीकडे दुर्लक्ष होईल. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या टाळा.

कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : १
प्रकृती ठणठणीत असल्याने प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल.

तूळ : शुभ रंग : मोतिया | अंक : ३
विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका. अनावश्यक खर्च कमी करा.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ४
तुम्ही काहीसे संवेदनशील असाल. एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल. तब्येत नरमच असेल.

धनू : शुभ रंग : आकाशी| अंक : ६
धंदेवाईक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील. वादविवादात आपल्याच मतावर अडून राहता येईल.

मकर : शुभ रंग : निळा| अंक : ५
तुमचा जास्त वेळ घराबाहेर जाईल. एखाद्या सामाज हिताच्या कामात लक्ष घालाल. गृहीणींना आज उसंत नाही. विद्यार्थी अभ्यासात चालढकल करतील.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७
आज कुटुंबियांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न कराल. काही जुन्या मित्रांचा सहवास लाभेल. आज मुलांच्या अभ्यासात लक्ष घालणेही अवश्यक आहे.

मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ९
आज दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. कलाक्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम संधी चालून येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...