आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य :जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

3 महिन्यांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक
  • आजची ग्रहस्थिती काही लोकांसाठी ठीक नाही

शनिवार, 11 एप्रिल रोजी अनुराधा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

  • मेष: शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८

आज घराबाहेर वावरताना डोके शांत ठेवायला हवे. आर्थिक धाडस आवाक्याबाहेर नको. आज काही फसव्या संधी येतील, हातचे सोडताना विचार करा.

  • वृषभ: शुभ रंग : हिरवा | अंक : ७

नवीन उपक्रमांची सुरवात उद्यावरच ढकलेली बरी. शासकिय कामे रखडणार आहेत. गृहीणींचा आज देवधर्माकडे ओढा राहील. आज देव नवसाला पावेल. 

  • मिथुन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ७

मान अपमानांच्या प्रसंगास तोंड द्यावे लागेल. थोडी संयमाची कसोटी राहील. दिवस तितकासा अनुकूल नसला तरी काही येणी असतील तर वसूल होतील. 

  • कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : १

काही मनाजोगत्या घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृध्दी होईल. उच्च राहणी  व उच्च विचारसरणी या तत्वाने वागाल. ज्येष्ठ मंडळींना प्रकृती उत्तम साथ देईल.

    

  • सिंह : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५

काही जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. पार्लर्स फोटोग्राफी, मॉडेलींग सारखे व्यवसाय तेजीत चालतील.विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. आईचे मन सांभाळा. 

  • कन्या : शुभ रंग : लाल | अंक : ४

संमिश्र फळे देणारा दिवस असून आज काम कमी व धावपळच जास्त होईल. एखादा पत्ता शोधण्यासाठी वणवण होईल. आज भावंडात सामंजस्य राहील.

  • तूळ: शुभ रंग : पिस्ता | अंक : २

कार्यक्षेत्रात मानमतराब वाढेल. अनपेक्षित हाेणारे लाभ मनाला दिलासा देतील. उपवरांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. 

 

  • वृश्चिक : शुभ रंग : अबोली | अंक : ६

मनाच्या लहरीपणास थोडासा लगाम गरजेचा आहे. अती महत्वाकांक्षांना ब्रेक लाऊन तब्येतीवरही लक्ष देणे गरजेचे आहे. जोडीदाराशी सामंजस्य राहील. 

  • धनू : शुभ रंग : पांढरा| अंक : ७

आज कंजूषपणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. बचतीचा विचार आज सोडूनच द्या. घरातील थोर मंडळींच्या होला हो करा. 

  • मकर : शुभ रंग : पिवळा | अंक : ५

वाणीत गोडवा ठेऊन विरोधकांनाही आपलेसे करु शकाल. राशीच्या लाभातून होणारे चंद्रभ्रमण आर्थिक सुबत्ता देईल. तुमचा उत्साह व कार्यक्षमता वाढेल.

  • कुंभ : शुभ रंग : भगवा | अंक : ९

नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. मित्र दिलेली अश्वासने पाळणार नाहीत. विद्यार्थ्यांनी पालकांच्या आज्ञेत राहणे हिताचे.

  • मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४

नोकरीच्या ठीकाणी इतरांच्या भानगडीत न पडता फक्त बिनचूक कामास प्राधान्य देणे हिताचे राहील. रिकाम्या गप्पांतून गैरसमज वाढतील. आज दैवाची साथ आहेच.

0