आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिवारचे राशिफळ:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 11 डिसेंबर रोजी रोहिणी पूर्व भाद्रपद नक्षत्र असल्यामुळे सिद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
आज कर्तव्या पेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल.चंगळवादी वृत्ती राहील. खर्चावर ताबा ठेवा.

वृषभ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ४
अती धावपळ टाळा. आज हार्ड वर्क पेक्षा स्मार्ट वर्क करणे हिताचे राहील. आज मित्र मोलाचे सल्ले देतील.

मिथुन : शुभ रंग : डाळींबी| अंक : १
शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज प्रत्येक कामांत उत्साह राहील. सकारात्मकता वाढेल.

कर्क : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
उद्योग व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. नोकरीत साहेबांचे मूड सांभाळणे गरजेचे. देव नवसास पावेल.

सिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ९
क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

कन्या : शुभ रंग : सोनेरी | अंक : ७
तुमचे मनोबल उत्तम राहील. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल. पत्नीच्या लहरी सांभाळाल.

तूळ : शुभ रंग : जांभळा| अंक : ८
काही नकारात्मक विचार मनात येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. व्यसनांपासून दूर रहा.

वृश्चिक : शुभ रंग : मारपंखी| अंक : ४
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. लहान मोठे आर्थिक लाभ होतील. विरोधकांचा विरोध मावळेल.

धनु : शुभ रंग : भगवा| अंक : २
कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. रिकाम्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देऊन कार्यक्षेत्रात अग्रेसर रहाल.

मकर : शुभ रंग : मोतिया| अंक : ५
आज काही अती हुषार मंडळी संपर्कात येतील. डोके शांत ठेवण्याची गरज. मुलांचे मस्तीचे प्रमाण वाढेल.

कुंभ : शुभ रंग : निळा| अंक : १
व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. शेजारी कुत्सित नजरेने बघतील.

मीन : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
एखाद्या नव्या उपक्रमाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम. व्यवासायिक नवे करार यशस्वी होतील.

बातम्या आणखी आहेत...