आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार 

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा राहील शनिवार

शनिवार 11 जुलै 2020 रोजी शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : क्रिम | अंक : ४

आज एखाद्या चांगल्या बातमीने दिवसाची सुरुवात होईल. धंद्यातील रखडलेली उधारी वसूल होईल.

वृषभ : शुभ रंग : राखाडी | अंक : १

आज तुम्ही फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर मात्र महागात पडेल. सामंजस्याचे धोरण हिताचे राहील.

मिथुन : शुभ रंग : आकाशी | अंक : ९

नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरिष्ठांच्या मागे-पुढे करावेच लागणार आहे. कोणतेही कौटुंबिक निर्णय वडिलधाऱ्यांच्या संमतीने घ्यावे लागतील.

कर्क : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ७

आज जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोत. वाद नकोतच.

सिंह : शुभ रंग : हिरवा| अंक : २

व्यावसायिक उलाढाल वाढेल. खर्च योग्य कारणांसाठी होईल. वैवाहिक जीवनात दाेघांत तिसऱ्याला प्रवेश नकाे.

कन्या : शुभ रंग : मरून| अंक : ३

वादविवादात आज तुम्ही स्वत:चेच घोडे पुढे दामटवाल. आर्थिक व्यवहारात मात्र सावध राहणे गरजेचे आहे.

तूळ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८

सौंदर्य प्रसाधने, चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. ऐशोआरामी वृत्ती बळावेल. चैन कराल.

वृश्चिक : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५

अथक श्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. आज भावंडातील गैरसमज दूर होतील.

धनू : शुभ रंग : पांढरा | अंक : ९

आर्थिक आवक पुरेशी असून आज परिवारात सलोख्याचे वातावरण राहील. मुले आज्ञेत असतील.

मकर : शुभ रंग : भगवा | अंक : ६

विविध मार्गाने पैसा येईल. हौसमौज करण्यासाठी सढळ हस्ते खर्च करू शकाल. तुमची जीवनशैली उंचावेल.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४.

व्यापाऱ्यांनी आपल्या मर्यादा ओळखूनच उलाढाली कराव्यात. अती आक्रमकतेने नुकसान होऊ शकेल.

मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : ३. आज

मौजमस्तीस तुमचे प्राधान्य राहील. मुलांचे हट्ट पुरवाल. व्यावसायिकांचे गुंतवणुकीच्या नव्या संधींकडे लक्ष राहील.

बातम्या आणखी आहेत...