आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 11 जूनचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. स्वाती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजची ग्रहस्थिती परीघ नावाचा अशुभ तयार करत आहे. या योगाच्या प्रभावामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...

मेष : शुभ रंग : पिस्ता| अंक : २
संमिश्र फळे देणारा दिवस असून काम कमी व दगदग धावपळच जास्त होईल. गृहीणींना थकवा जाणवेल.

वृषभ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३
काही मनाजोगत्या घटनांनी तुमच्या आत्मविश्वासात वृध्दी होईल. ज्येष्ठांनी प्रकृतीची काळजी घ्यायला हवी.

मिथुन : शुभ रंग : सोनेरी | अंक : १
जुनी रेंगाळलेली प्रकरणे मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना आज अभ्यासात गोडी वाटेल. आईचे मन सांभाळा.

कर्क : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
नोकरीच्या ठीकाणी अधिकारात वाढ होईल. तुमचे कार्यक्षेत्र विस्तारेल. आईचेे सल्ले योग्यच असतील.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८
आर्थिक सुबत्ता येईल. मृदु वाणीने विरोधकांना आपलेसे कराल. आज शेजारी सलोखा राहील.

कन्या : शुभ रंग : आकाशी | अंक : ९
कार्यक्षेत्रात सन्मान वाढेल. वक्त्यांची भाषणे प्रभावी होतील. अनपेक्षित लाभ मनाला दिलासा देतील.

तूळ : शुभ रंग : पांढरा | अंक : ६
आज कंजूषपणा बाजूला ठेवून काही अत्यावश्यक खर्च करावेच लागणार आहेत. बचतीचा विचार नको.

वृश्चिक : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
मनाच्या लहरीपणास आवर घालणे गरजेचे. अती महत्वाकांक्षांना ब्रेक लाऊन तब्येतीवरही लक्ष द्यावे.

धनु : शुभ रंग : निळा| अंक : ५
कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच राहील. तब्येत नरम असली तरी कामातील उत्साह दांडगा राहील.

मकर : शुभ रंग : क्रिम| अंक : १
व्यावसायिक महत्वाचे करार आज दिवसाच्या उत्तरार्धात कराल तर बरे. अधिकार जपून वापरा.

कुंभ : शुभ रंग : जांभळा| अंक : ४
अनोळखी व्यक्तींवर चुकुनही विश्वास ठेऊ नका. आज ताकही फुंकून प्यावे असा दिवस. सतर्क रहा.

मीन : शुभ रंग : हिरवा| अंक : ६
आज क्षुल्लक कारणाने चिडचिड होईल. तरूणांनी गैरवर्तन टाळावे. प्रेमप्रकरणे मनस्तापच देतील.

बातम्या आणखी आहेत...