आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 12 डिसेंबरची सुरुवात अशुभ योगामध्ये होत आहे. विशाखा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे अतिगंड नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. अशुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : निळा| अंक : १
आज विद्वान मंडळींचा सहवास लाभेल. तुमचे विचार प्रगल्भ होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील.

वृषभ : शुभ रंग : क्रीम| अंक : ३
आज कष्टांच्या प्रमाणात मोबदला कमीच असला तरी तुमचा कामातील उत्साह दांडगा राहील. आजच्या कष्टांचे फळ आज नाही तरी उद्या नक्कीच मिळेल.

मिथुन : शुभ रंग : गुलाबी| अंक : २
नोकरदारांना तेच ते काम कंटाळवाणे वाटेल. कामावर दांडी मारून थोडे करमणुकीस प्राधन्य द्यावेसे वाटेल. प्रेमप्रकरणांना ग्रीन सिग्नल आहे.

कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ४
आज कुटुंबीयांना अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल. एखाद्या घरगुती समारंभात हजेरी लावाल.

सिंह : शुभ रंग : लाल| अंक : ५
आज एखादी गुप्त बातमी समजेल. गृहिणींनी आज झाकली मूठ झाकलीच ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.

कन्या : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
राशीच्या धनस्थानातून होणारे चंद्रभ्रमण अनपेक्षित पैसा मिळवून देईल. भाग्योदयाकडे वाटचाल होईल.

तूळ : शुभ रंग : जांभळा|अंक : ६
मन चंचल राहील. काम कमी व धावपळच जास्त. हातचे सोडून पळत्या मागे धावण्याचा मोह होईल.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी|अंक : ७
पैसा येण्याइतकेच पैसा जाण्याचेही मार्ग प्रशस्त अाहेत. छंदी फंदी वृत्तीस थोडा लगाम घालणे गरजेचे आहे.

धनु : शुभ रंग : सोनेरी| अंक : ९
आवक मनाजोगती असेल. पैशाअभावी रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. मित्रमंडळींत मोठेपणा मिळेल.

मकर : शुभ रंग : केशरी|अंक : ८
अधिकारी वर्गाचे दडपण जाणवेल. आज नाकासमोर चालणेच हिताचे राहील. आज कायदा मोडू नका.

कुंभ : शुभ रंग : पांढरा|अंक : १
आज तुम्हाला वाढत्या जबाबदाऱ्यांचे दडपण येईल. महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी मंडळींचा सल्ला घ्या.

मीन : शुभ रंग : चंदेरी| अंक : ६
भागीदारी व्यवसायात काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होण्याची शक्यता आहे. देण्या-घेण्याच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवा.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser