आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजची ग्रहस्थिती काही लोकांसाठी ठीक नाही

शनिवार, 12 सप्टेंबर रोजी आद्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 5 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 7 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : १
इतरांस दिलेले शब्द पाळावे लागतील. आज काही प्रवास करावे लागतील. मौल्यवान ऐवज सांभाळा.

वृषभ: शुभ रंग : लेमन | अंक : ३
शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने आज तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ४
महत्वाची कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी.थोडी मानसिक अस्वस्थता राहील. काही महत्वाची मेल्स येणार आहेत. आज जोडीदारास सरप्राईझ गिफ्ट द्याल.

कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २
क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

सिंह :शुभ रंग : लाल|अंक : ५
मनोबल उत्तम असेल. तुमच्यातील उत्साह इतरांस प्रभावित करेल. संध्याकाळी एखदा अचानक लाभ होईल.

कन्या : शुभ रंग : चंदेरी|अंक : ६
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण राहील. विरोधकांचा त्रास कमी होईल. श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.

तूळ : शुभ रंग : आकाशी|अंक : ९
दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. सत्संगाने मानसिक बळ मिळेल.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी|अंक : ७
मानसिक संतुलन बिघडवणारे काही प्रसंग घडतील. आज काही नकारात्मक विचार मनात येतील.

धनु : शुभ रंग : जांभळा|अंक : ८
तब्येत ठणठणीत राहील. प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरतील. मित्रांच्या मदतीस धाऊन जाल.

मकर : शुभ रंग : निळा|अंक : ५
आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. महत्वाचे व्यावसायिक करार दुपारनंतर करावे.

कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ३
तब्येत ठणठणीत राहील. अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहेत. आवडत्या छंदातून कमाई होईल.

मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : २
कौटुंबिक स्तरावर आनंदी दिवस. काही मनासारख्या घटना तुमाचा कार्यउत्साह वाढवतील. आज मुले अज्ञाधारकपणे वागतील.