आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रीती नावाचा शुभ योगामध्ये होत आहे शनिवारची सुरुवात

शनिवार 13 जूनला पूर्व भाद्रपदा नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर चार राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष: शुभ रंग : पिस्ता | अंक : ४

आवक चांगली असली तरी पैसा जपून वापरायला हवा.आज संध्याकाळी एखादा मोठा खर्च उद्भवू शकतो.

वृषभ: शुभ रंग : मोतिया | अंक : ९

अती धावपळ टाळा. हार्डवर्कपेक्षा स्मार्टवर्क करण्यास प्राधान्य द्या. व्यवसायात काही उत्तम संधी चालून येतील. एखाद्या नव्या उपक्रमाची सुरुवात करायला हरकत नाही.

मिथुन : शुभ रंग : तांबूस | अंक : ९

व्यवसायातील वाढती स्पर्धा तुम्हाला बेचैन करेल. कौटुंबिक वाढत्या गरजांमुळे जमाखर्चाचा तराजू डळमळीत होण्याची शक्यता आहे. कायद्यात राहा.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ३

अति हुषार मंडळी संपर्कात येणार आहेत. व्यर्थ वाद घालू नका, आज डोके शांत ठेवणेच हिताचे राहील.

सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६

कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. नोकरीत वरिष्ठांचे समाधान अशक्य. आज धाडस नकोच.

कन्या : शुभ रंग : राखाडी | अंक : ८

सभा-संमेलनात तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. जोडीदाराचे मन जपण्याचा प्रयत्न कराल.

तूळ : शुभ रंग : क्रीम | अंक : २

काही गोडबोली माणसे भेटतील. झटपट लाभाचा मोह टाळणेच हिताचे. पत्नीच याग्य सल्ले देईल.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ७

नोकरीच्या ठिकाणी कामाशिवाय फार खोलात शिरू नका. आज रुग्णांनी पथ्यपाणी सांभाळावे.

धनू : शुभ रंग : आकाशी | अंक : ३

चंगळवादी वृत्ती राहील. बऱ्याच दिवसांनी जुन्या मित्रांच्या सहवासात रमाल. आरोग्य उत्तम राहील.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : १

कुटुंबात आर्थिक सुबत्ता नांदेल. मनोबल वाढवणाऱ्या काही घटना घडणार आहेत. अनुकूल दिवस.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४

आज तुम्ही कर्तव्यापेक्षा मौजमजेस प्राधान्य द्याल. अति परखड बोलण्याने आपलीच माणसे दुरावतील.

मीन : शुभ रंग : मरून | अंक : २

अडचणी आज देवालाच सांगा. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय कदाचित चुकण्याची शक्यता आहे. 

बातम्या आणखी आहेत...