आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 13 मार्च रोजी पूर्व भाद्रपद नक्षत्र असल्यामुळे साध्य नावाचा योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या सात राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : तांबडा| अंक : ८
उद्योग-व्यवसायात मनाजोगती धनप्राप्ती होईल, नवे हितसंबंध तयार होतील. मित्र अश्वासने पाळतील.

वृषभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ३
काही खोटी स्तुती करणारी मंडळी भेटतील. सतर्क राहा. मित्रांना पार्टी आज नको. आपला स्वार्थ बघा. भावनेपेक्षा कर्तव्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे.

मिथुन : शुभ रंग : मोतिया| अंक : ९
व्यवसायात आर्थिक उलाढाली भागीदारांना विश्वासात घेऊनच करा. शासकीय कामे रखडणार आहेत. गृहिणींना थोरांचे मानपान सांभाळावे लागतील.

कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ६
आज मनाच्या द्विधा अवस्थेत निर्णय घेण्याची घाई करू नका. विरोधकांना व स्पर्धकांंना कमजोर समजू नका.

सिंह : शुभ रंग : जांभळा|अंक : ८
वैवाहिक जीवनात एकमत असून आज जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल. तरी हातचे राखूनच बोला.

कन्या : शुभ रंग : भगवा|अंक : ७
केवळ मोठेपणासाठी आज न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका. नावे ठेवणाऱ्या मंडळींकडे दुर्लक्ष करा.

तूळ : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. आशादायी दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी| अंक : ६
रिकामटेकड्या गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य दिलेत तर बरे होईल. महत्त्वाच्या कामासाठी भटकंती होईल.

धनू : शुभ रंग : चंदेरी|अंक : १
अनपेक्षितपणे काही रक्कम हाती येऊ शकेल. भावंडांत काही व्यावहारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.

मकर : शुभ रंग : राखाडी|अंक : ४
हौसमौज करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल. मित्र-मैत्रि णींच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल.

कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : ५
कालपासून एखादी वस्तू हरवली असेल तर ती आज परत शोधा, दुपारनंतर ती सापडेल. दैव तुमच्याच बाजूने.

मीन : शुभ रंग : भगवा| अंक : ३
सकाळी पैशाने भरलेले खिसे आज दुपारनंतर रिकामे होण्याची शक्यता आहे. थोडा खर्चास आवर घाला. दूरचे नातलग संपर्कात येतील.

बातम्या आणखी आहेत...