आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 13 नोव्हेंबर रोजी शतभिषा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या ग्रह-स्थितीमुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. अशुभ योगामुळे शनिवारी 12 पैकी 7 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. आज कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. संयम बाळगावा. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : हिरवा| अंक : २
कार्यक्षेत्रात अनुकूलता वाढेल. पूर्वीचे कष्ट कारणी लागतील. मासन्मानात वृध्दी होईल. उत्तम दिवस.

वृषभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ५
दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. प्रवास कंटाळवाणे होतील. आज प्रवासात मौल्यवान ऐवज जपा.

मिथुन : शुभ रंग : क्रिम| अंक : ४
राहत्या जागेचे प्रश्न सुटतील. सकाळी वजनदार असलेले खिसे आज संध्याकाळी रिकामे होतील.

कर्क : शुभ रंग : केशरी| अंक : ३
आर्थिक अडचणी असतील तर त्यावर दुपारनंतर मार्ग निघेल. अडचणीच्या प्रसंगी मित्र धाऊन येतील.

सिंह : शुभ रंग : निळा | अंक : ८
आत्मविश्वास व मनोबलात वृध्दी होईल. महत्वाचे व्यावसायिक करार आज दुपारनंतर कलेले बरे.

कन्या : शुभ रंग : आकाशी | अंक : १
घाईगर्दीत घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता आहे. ज्यात काही कळत नाही त्यात उगीच डोकाऊ नका.

तूळ : शुभ रंग : पांढरा| अंक : ९
महत्वाची सर्व कामे दुपारपूर्वीच उरकून घेतलेली बरी. नोकरदारांनी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे.
वृश्चिक : शुभ रंग : गुलाबी| अंक : ६
नोकरीत कामाचा ताण वाढेल. तरूणांना घरात थोरांच्या शब्दास मान द्यावा लागेल. गृहीणी व्यस्त.

धनु : शुभ रंग : मोतिया| अंक : ७
तुम्हाला प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही आर्थिक आवकही पुरेशी राहील.

मकर : शुभ रंग : मोरपंखी| अंक : २
पारिवारिक समस्या सहज सुटल्याने आनंदी व उत्साही असाल. कलाकारांना प्रसिध्दी मिळेल.

कुंभ : शुभ रंग : राखाडी| अंक : ५
कुठलीही गोष्ट सहज शक्य नाही. तरीही तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांस यश मिळेल. भटकंती होईल.

मीन : शुभ रंग : मरून| अंक : ८
कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही पुरेपुर राहील.आज प्रिय पाहुण्यांचे घरी आगमन होईल. छान दिवस.

बातम्या आणखी आहेत...