आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 15 ऑगस्ट रोजी मृगशीर्ष नक्षत्र असल्यामुळे हर्षण नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 8 राशीच्या लोकांसाठी दिवस खास राहील. काही लोकांचा अडकलेला पैसा परत मिळू शकतो. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : मरून | अंक : २
काही दुरावलेल्या हितसंबंधांत सुधारणा होईल. पूर्वीच्या श्रमांचे चीज होईल व यश दृष्टिक्षेपात येईल.

वृषभ : शुभ रंग : निळा | अंक : १
तरुणांनी मौजमजा करताना नीतिमत्तेचे भान ठेवावे. उद्धटपणास लगाम गरजेचा. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.

मिथुन : शुभ रंग : सोनेरी| अंक : ४
आज पर्यटनाचे व्यवसाय तेजीत चालतील. आपल्या अधिकारांचा दुरुपयोग टाळावा. व्यवसायात स्पर्धेस तोंड देण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी हवी.

कर्क : शुभ रंग : राखाडी|अंक : ३
उत्साही व आनंदी आजचा दिवस. विवाहाविषयक बोलणी करण्यासाठी आजचा दिवस योग्य.

सिंह : शुभ रंग : लाल|अंक : ६
कार्यक्षेत्रात आपले महत्त्व सिद्ध करू शकाल. कामाच्या व्यापात आज तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे.

कन्या : शुभ रंग : चंदेरी|अंक : ७
महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार अाहे.आज तुमचा अाध्यात्मिक मार्गाकडे ओढा राहील.

तूळ : शुभ रंग : हिरवा|अंक : २
आज अति आक्रमकता नुकसानीस कारणीभूत होईल. कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले टाका. सतर्क राहा.

वृश्चिक : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ८
व्यापाऱ्यांसाठी उत्तम दिवस. दुकनदारांच्या गल्ल्यात लक्षणीय वाढ होईल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

धनू : शुभ रंग : सोनेरी | अंक : ४
हाताखालच्या माणसांशी जुळवून घ्यावे लागेल. काही जुनी येणी मागितलीत तर वसूल होण्याची शक्यता आहे.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९
अाधुनिक राहणीमानाकडे कल असेल.चैनी व विलासी वृत्ती बळावेल. सढळ हाताने खर्च कराल.

कुंभ : शुभ रंग : जांभळा | अंक : ३
कौटुंबिक जीवन समाधानी असेल. तुम्ही कार्यक्षेत्रातही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकाल. आनंदी दिवस.

मीन : शुभ रंग : भगवा | अंक : ५
तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. गृहिणींना शेजारधर्म पाळावे लागणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...