आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 16 जानेवारी रोजी शतभिषा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे, यासोबतच आजच्या ग्रह स्थितीमुळे व्यतिपात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावामुळे 7 राशीच्या लोकांना अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. कामामध्ये तणाव वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष: शुभ रंग: पांढरा| अंक : ८
आज नोकरीत वरीष्ठांचे दडपण असेल. फक्त कर्तव्यास प्राधान्य द्यावे लागणार आहे. संध्याकाळी लाभ होईल.

वृषभ: शुभ रंग: जांभळा| अंक : ३
कौटुंबिक वाद असतील तर आज दुपारनंतर ते सुसंवादाने मिटू शकतील. गृहीणींना थोरांचे मानपान सांभाळावे लागतील.

मिथुन : शुभ रंग : क्रिम| अंक : ९
आपले म्हणणे इतरांना पटावेच असा अट्टहास आज करून चालणार नाही. कुणालाही मोफत सल्लेवाटप करू नका. आज फक्त आपल्या ताटात बघुन जेवा.

कर्क : शुभ रंग : तांबडा| अंक : १
जोडीदाराशी सामंजस्य राहील. इतरांस दिलेले शब्द पाळता येतील. प्रवास कंटाळवाणे होणार आहेत.

सिंह :शुभ रंग : गुलाबी|अंक : ७
दैनंदीन कामातही अडथळे येतील. आरोग्याच्या काही तक्रारी हैराण करतील. संतुलन बिघडू शकेल.

कन्या : शुभ रंग : हिरवा|अंक : ९
आज मनाजोगते आर्थिक लाभ होणार आहेत. प्रतिष्ठीतांच्या गाठीभेटी लाभदायक ठरणार आहेत.

तूळ : शुभ रंग : मोतिया| अंक : ५
कौटुंबिक स्तरावर काही मनासारख्या घटना तुमचा उत्साह वाढवतील. मुले अज्ञाधारकपणे वागतील.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ६
क्षुल्लक मनाविरुध्द गोष्टींनीही राग अनावर होईल.महत्वाच्या चर्चा व बैठकी आज टाळलेल्याच बऱ्या.

धनु : शुभ रंग : मोतिया| अंक : ४
नोकरीधंद्यात उत्साही वातावरण असेल. आर्थिक लाभ होतील. श्रमसाफल्याचे समाधान मिळेल.

मकर : शुभ रंग : निळा| अंक : १
आज प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. खर्च वाढता असला तरीही आज पैशाची कमतरता भासणार नाही.

कुंभ : शुभ रंग : आकाशी| अंक : २
नोकरदारांना साहेबांचे मुड व घरी जोडीदाराचेही मूड सांभाळावे लागतील. सकुटुंब चैन कराल.

मीन : शुभ रंग : मोरपंखी| अंक : १
तुमच्यातील सकारात्मकता समोरच्यास प्रभावित करेल. दुपारनंतर एखादी महत्वाची बातमी कळेल.

बातम्या आणखी आहेत...