आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार 17 एप्रिल 2020 ला मृगशीर्ष नक्षत्र असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील शनिवार...

मेष : शुभ रंग : डाळिंबी| अंक : २
महत्त्वाच्या वाटाघाटीत आपल्याच मुद्द्यावर अडून राहाल. रखडलेले उपक्रम पूर्ववत सुरू करता येतील.

वृषभ : शुभ रंग : मोरपिशी| अंक : १
आज एखादी गोष्ट फारच मनाला लावून घ्याल.तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका.

मिथुन : शुभ रंग : मरून| अंक : ३
बेरोजगारांनी रोजगारासाठी दूरगावी जाण्याची तयारी ठेवावी. उच्च अधिकारी वर्गास बढतीबरोबर बदलीही स्वीकारावी लागेल. आज खर्च आवाक्याबाहेर राहील.

कर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : ४
प्रतिष्ठितांच्या ओळखी आपला स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील. आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस.

सिंह : शुभ रंग : चंदेरी|अंक : ६
कामाचा व्याप, अति महत्त्वाकांक्षा यामुळे सैरभैर व्हाल. स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ काढणे अशक्य होईल.

कन्या : शुभ रंग : हिरवा|अंक : ५
व्यवसायाच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असल्याने नव्या उपक्रमाची सुरुवात टाळा. आज भक्तिमार्गात गोडी वाटेल.

तूळ : शुभ रंग : राखाडी| अंक : ७
वैवाहिक जीवनात फार अपेक्षा नकोत. सगळयाच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील अशी अपेक्षा नकाे.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा| अंक : ९
कठोर बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. आज पत्नीस वेळ देणे हिताचे राहील.

धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी|अंक : ८
विश्रांतीची गरज भासेल. कुणाकडून येणी असतील तर मागायला लाजू नका. पत्नीस नाही म्हणू नका.

मकर : शुभ रंग : गुलाबी|अंक : ९
आज तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. मुलांचे हट्ट आनंदाने पुरवाल.

कुंभ : शुभ रंग : निळा|अंक : ५
‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ हे लक्षात ठेवा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकलेल्या बऱ्या.

मीन : शुभ रंग : पांढरा|अंक : ४
काही जणांना घरदुरुस्तीच्या किरकोळ कामात लक्ष घालावे लागणार आहे. आज कदाचित वाहनही रस्त्यात रुतून बसेल.

बातम्या आणखी आहेत...