आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशनिवार 17 जुलै रोजी चित्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती शिवा नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.
येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...
मेष : शुभ रंग : गुलाबी | अंक : २
आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुद्ध गोष्टींनीही राग अनावर होईल.
वृषभ : शुभ रंग : मरून | अंक : ७
अनपेक्षित धनप्राप्ती होईल. क्षुल्लक गैरसमजामुळे दुरावलेले अाप्तस्वकीय जवळ येतील. छान दिवस.
मिथुन : शुभ रंग : मोतिया| अंक : ५
पैशाअभावी रखडलेल्या योजना मार्गस्थ होतील. आज कार्यक्षेत्रात श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.
कर्क : शुभ रंग : निळा| अंक : ४
कार्यक्षेत्रात रागरंग बघूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. थोड्याफार आराेग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात.
सिंह : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ६
खर्चिक वृत्तीमुळे पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. कौटुंबिक स्तरावर आनंदी घटना घडतील.
कन्या : शुभ रंग : पांढरा | अंक : ८
शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील. आवक मुबलक राहील.
तूळ : शुभ रंग : तांबडा| अंक : २
खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता भासणार नाही. एखादा दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे.
वृश्चिक : शुभ रंग : राखाडी| अंक : ४
दैनंदिन कामे वेळेवर होतील. काही भाग्यवंतांची वास्तूविषयक स्वप्ने साकार होतील. आनंदी दिवस.
धनू : शुभ रंग : जांभळा| अंक : ९
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकांचा जोर आता कमी होणार आहे.
मकर : शुभ रंग : पांढरा| अंक : १
व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करून चालणार नाही. सरकारी कामात विलंब होईल.
कुंभ : शुभ रंग : क्रीम| अंक : ८
उद्योग-धंद्यात तीव्र स्पर्धा असेल. झटपट लाभाचा मोह टाळावा. पत्नीच्या हो ला हो करून विषय संपवा.
मीन : शुभ रंग : हिरवा| अंक : ३
नोकरदारांना साहेबांच्या तसेच घरात पत्नीच्याही लहरी सांभाळाव्या लागतील. दिलेले शब्द पाळावे लागतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.