आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शनिवार, 17 ऑक्टोबर रोजी चंद्रावर शनीची वक्र दृष्टी राहील. यामुळे काही लोकांच्या जॉब आणि बिझनेसमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. 12 पैकी 6 राशीच्या लोकांनी आज सांभाळून राहावे. दिवसभर तणाव राहील आणि धावपळ होऊ शकते. ठरवलेली काम अपूर्ण राहू शकतात. या व्यतिरिक्त इतर सहा राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष: शुभ रंग : मोरपिशी| अंक : २
धंद्यातील आवक-जावक सेम सेमच राहील. गृहिणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदित होतील.

वृषभ: शुभ रंग : निळा| अंक : ३
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांनी दिलेल्या शाब्बासकीस बळी जाऊ नका. हाताखालच्या लोकांशीही सलोख्याचे संबंध गरजेचे आहेत. उपासनेत खंड पडू देऊ नका.

मिथुन : शुभ रंग : चंदेरी|अंक : ६
विविध मार्गी आलेला पैसा विविध मार्गांनी जाईल.आपला बडेजाव दाखवण्यासाठी खर्च कराल. आज सहकुटुंब मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल.

कर्क : शुभ रंग : स्ट्राॅबेरी|अंक :१
दैनंदिन कामांचा कंटाळा येईल. इतरांना न जमणारे काहीतरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील.

सिंह :शुभ रंग : पांढरा| अंक : ४
अथक परिश्रमांच्या साहाय्याने प्रगतीची चक्रे गतिमान ठेवता येतील. गृहिणी आपल्या आवडीस प्राधान्य देतील.

कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : ५
आज बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. गृहिणी सांसारिक जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडतील.

तूळ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ९
आज घराबाहेर रागीट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक तपासा.

वृश्चिक : शुभ रंग : भगवा| अंक : ७
तुमची आज मोठ्या लोकांमधील ऊठबस फायदेशीर राहील. विवाहेच्छुकांना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील.

धनु : शुभ रंग : राखाडी| अंक : ८
नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठांचे दडपण जाणवेल. अधिकारी वर्गास कामगारांचे प्रश्न सोडवावे लागतील.

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : ४
हौसमौज करताना आज मर्यादांचे उल्लंघन करू नका. वाहतुकीचे नियम माेडलेत तर दंड चुकणार नाही.

कुंभ : शुभ रंग : केशरी | अंक : ६
काही अयोग्य माणसे संपर्कात येतील. महत्त्वाचे निर्णय घेताना आज द्विधा मन:स्थिती होणार आहे.

मीन : शुभ रंग : तांबडा | अंक : ८
व्यवसायात महत्त्वाचे करारमदार यशस्वी होतील.वैवाहिक जीवनात एकमत राहील. आनंदी दिवस. प्रकृतिस्वास्थ्य उत्तम राहील.

बातम्या आणखी आहेत...