आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

आजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ध्रुव नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

शनिवार 18 जुलै रोजी मृग नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असून आजच्या ग्रह-स्थितीनुसार ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज 12 पैकी 7 राशीच्या लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...

मेष: शुभ रंग : क्रीम | अंक : ८
खर्चिक स्वभावामुळे पैसा कितीही आला तरी पुरणार नाही. कौटुंबिक स्तरावर मनासारख्या घटना घडतील.

वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : ७
मनोबल उत्तम असेल. तुमच्यातील सकारात्मकता इतरांस प्रभावित करेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम असल्याने प्रत्येक कामांत प्रचंड उत्साह राहील.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ५
खर्च वाढता असला तरीही पैशाची कमतरता जाणवणार नाही. एखादा दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. घराबाहेर वाद टाळा. मौल्यवान ऐवज सांभाळा.

कर्क : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६
दैनंदिन कामे वेळीच पार पडतील. काही भग्यवंतांची वास्तुविषयक स्वप्ने साकार होतील. आनंदी दिवस.

सिंह : शुभ रंग : मरून| अंक : ४
नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. विरोधकांचा जोर आता कमी होणार आहे.

कन्या : शुभ रंग : पिस्ता| अंक : २
व्यवसायात स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करून चालणार नाही. सरकारी कामात विलंब होईल.

तूळ : शुभ रंग : पांढरा | अंक : ३
उद्योग-व्यवसायात स्पर्धा अटळ आहे. झटपट लाभाचा मोह टाळा. पत्नीच्या हो ला हो करून विषय संपवा.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : १
नोकरदारांना साहेबांच्या तसेच घरात पत्नीच्याही लहरी सांभाळाव्या लागतील. दिलेले शब्द पाळावे लागतील.

धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९
आज काही नकारात्मक विचार मनात येतील. काही क्षुल्लक मनाविरुद्ध गोष्टींनीही राग अनावर होईल.

मकर : शुभ रंग : जांभळा | अंक : ३
अनपेक्षित धनप्राप्ती होईल. क्षुल्लक गैरसमजामुळे दुरावलेले आप्तस्वकीय जवळ येतील. छान दिवस.

कुंभ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ५
पैशाअभावी रखडलेल्या योजना मार्गस्थ होतील. आज कार्यक्षेत्रात श्रमसाफल्याचे समाधान मिळवाल.

मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : १
कार्यक्षेत्रात रागरंग बघूनच महत्त्वाचे निर्णय घ्यावेत. थोड्याफार आराेग्याच्या तक्रारी उद्भवतील. शेजारी आपुलकीने डोकावतील.

0